Worlds most expensive potato : बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. कारण तो कोणताही भाजीत टाकला तरी तो आपली एक वेगळी चव निर्माण करतो. पण बटाट्याला कधीच राजासारखी वागवलं गेलं नाही किंवा त्याला म्हणावी तशी किंमतही मिळत नाही. बटाट्याचा प्रत्येक भाजीत वापर केला जातो. पण आपण आज अशाप्रकारच्या बटाट्याबद्दल बोलत आहोत, तो खाण्याआधी तुम्ही शंभर वेळा विचार कराल. या बटाट्याची किंमत इतकी जास्त आहे की, लोकांना आपण बटाटा खरेदी करतोय की, सोनं असा अनुभव येत आहे. पण सोने खरेदीपेक्षा ते बटाटा विकत घेणे चांगले मानतात.
आपण आज अशा बटाट्याबद्दल बोलत आहोत ज्याला ‘ले बोनेट बटाटा’ म्हणतात. हा १ किलो बटाटा विकत घेण्यासाठी तुम्हाला ५० हजार रुपये मोजावे लागतात. या किंमतीत तुम्ही १० ग्रॅम सोने सहज खरेदी करु शकतात. मात्र हा बटाटा इतका महाग असूनही या बटाट्याला जगभरात मोठी मागणी आहे, श्रीमंत लोक हा बटाटा मोठ्या आवडीने खातात.
‘ले बोनेट’ बटाटा इतका महाग विकला जातो कारण तो वर्षभरात फक्त १० दिवस बाजारात येतो. याचे उत्पादन फ्रान्समधील इले डी नॉर्मोटियर बेटावर घेतले जाते. याशिवाय या बटाट्याचे उत्पादन इतर कुठेही घेतले जात नाही, यामुळेच या बटाट्याची किंमत एवढी जास्त आहे.
असे म्हटले जाते की, बटाट्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्याची साल देखील फायदेशीर असते. या बटाट्यापासून सॅलड, प्युरी, सूप आणि खास क्रीम बनवली जाते. जर एखाद्या भारतीयाने ते विकत घेतले तर त्यापासून समोसे देखील बनवू शकतात किंवा घरी बटाटा जिरे देखील बनवू शकतात. पण या बटाट्याची किंमत एवढी जास्त आहे की, सामान्य माणूसही हा बटाटा विकत घेण्यासाठी घाबरतो.