World’s Most Expensive Train: रेल्वे प्रवास म्हटलं की कायम गर्दी, प्रवाशांची दादागिरी आणि अस्वच्छता असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण, तरीही अनेक जण रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतात आज अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येते. पण, भारतासह जगात अशा काही लक्झरीयस ट्रेन्स आहेत, ज्यातून तुम्हाला राजेशाही थाटात प्रवास करण्याचा अनुभव घेता येतो. या ट्रेन्सचं तिकीट भाडं अतिशय महाग आहे. याच महागड्या ट्रेन्सविषयी आपण जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्स्प्रेस ही जगातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी ट्रेन आहे. ही ट्रेन बेलमंड कंपनीद्वारे चालवली जाते. या लक्झरी ट्रेनमध्ये १९२० च्या दशकातील रिस्टोर्ड कोच आहेत, ज्यामध्ये मार्बल फरशीचे बाथरुम, २४ तास बटलर सेवा आणि फ्री-फ्लोइंग शॅम्पेनची सुविधा आहे. तसेच पुस्तकांनी भरलेली लायब्ररी आणि एक सिक्रेट टीरूम आहे.

हेही वाचा – ट्रेनमध्ये १५ रुपयांची पाण्याची बाटली २० रुपयांना; प्रवाशाची १३९ वर तक्रार, रेल्वेने कॅटरिंग कंपनीवर ठोठावला इतक्या लाखांचा दंड

लंडन, पॅरिस, व्हेनिस, प्राग, बुडापेस्ट आणि व्हिएन्ना यांसारख्या प्रमुख युरोपिय शहरांमध्ये प्रवासी या आयकॉनिक ट्रेनमधून प्रवास करतात. या ट्रेनमधील लक्झरी L’Observatoire सूटमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठीची किंमत ८८ लाख रुपये मोजावी लागते. या सूटला ‘आर्टवर्क इन मोशन’ असंही म्हटलं जातं. यामध्ये प्रायव्हेट डायनिंग रुमही उपलब्ध आहे.

पाऊल थकलं न्हाई! आजी-आजोबांचं ‘असं’ प्रेम मिळायला नशीब लागतं; VIDEO पाहून पाणावतील डोळे

या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पंचतारांकित हॉटेल्सप्रमाणे जेवण मिळते. या जेवणाचं स्वरुप Full Course Meal अशा पद्धतीने असते. याशिवाय वाइनपासून शॅम्पेन किंवा टॉप क्वालिटीच्या स्पिरीट्सचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये असणाऱ्या L’Observatoire लक्झरी सुईटसाठी एका रात्रीसाठी तब्बल ८८ लाख रुपये इतकी किंमत आहे.

L’Observatoire लक्झरी सुईटसाठी मार्च २०२५ पासून बुकिंग सुरु होईल. या अलिशान सूईटमध्ये दोन लोक झोपू शकतात. तुम्ही याचे तिकीट ऑनलाईन किंवा रिझर्व्हेशन टीमद्वारे बुक करु शकता.

Belmond कंपनीद्वारे या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ३०० किमीच्या अंतरापर्यंत पिकअप आणि ड्रॉप-ऑफची सेवा पुरवली जाते. या ट्रेननं प्रवास करताना प्रवाशांना प्रवासादरम्यान अविस्मरणीय अनुभव घेता येतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds most expensive train luxurious rail suite lobservatoire is start in venice simplon orient express one night rent is 88 lakh rupees sjr