World’s Shortest Flight: आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचं हे तुमच्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल, काहींचे हे स्वप्न पूर्ण देखील झाले असेल तर काही त्यासाठी प्रयत्न करत असतील. एकूणच लोकांमध्ये विमान प्रवासाबाबत एक वेगळं कुतूहल असते. त्यामुळे अनेक विमान कंपन्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी हल्ली स्वस्तात विमान प्रवासाबाबत वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. दरम्यान तुम्ही आत्तापर्यंत अनेक सर्वात लांबच्या विमान प्रवासाबाबत ऐकले असेल. यात प्रवासाठी म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याच्या दोन ते तीन दिवसांचा वेळ लागतात. पण तुम्हाला असा विमान प्रवास माहितेय का, जो अवघ्या काही सेकंदात पूर्ण होतो. होय, हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल पण असा एक विमान प्रवास आहे जो फक्त ७४ सेकंदात पूर्ण होतो.म्हणजेच विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अवघ्या ७४ सेकंदात पोहोचते. पण हा विमान प्रवास नेमका कोणत्या देशातून होतो? तसेच प्रवासाचा वेळ इतका कमी कसा? जाणून घेऊ काही रंजक गोष्टी

हा असा विमान प्रवास आहे. ज्यात तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही तासात किंवा मिनिटांत नाही तर सेकंदात पोहोचवले जाते. त्यामुळे याला जगातील सर्वात लहान विमान उड्डाण असे म्हटले जाते. हे विमान उड्डाण Loganair द्वारे चालवले जाते.

स्कॉटलंडमधील वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रेच्या ऑर्कने बेटांदरम्यान हे विमान झेपावते. या अनोख्या स्कॉटिश फ्लाइटने आपला संपूर्ण प्रवास अवघ्या दीड मिनिटात पूर्ण केला. या फ्लाइटची माहिती सोशल मीडियावर समोर आली आहे.ती आपण सविस्तर जाणून घेऊ…

प्रवास काही सेकंदात होतो पूर्ण

व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दोन ठिकाणांमधील अंतर कापण्यासाठी या विमानाला कधीकधी १ मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. आतापर्यंत नोंदवलेला सर्वात कमी वेळ ५३ सेकंद आहे. हा अनोखा विक्रम पायलट स्टुअर्ट लिंकलेटरच्या नावावर आहे.

या मार्गावर १९६७ पासून विमान उड्डाणे सुरू आहेत, ज्याने जगातील सर्वात कमी उड्डाणाचा विक्रम मोडला आहे.हे विमान शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस प्रवास करते.

यात स्टुअर्ट लिंकलेटरने आतापर्यंत १२,०००० पेक्षा जास्त वेळा हे विमान घेऊन उड्डाण केले आहे, जो आतापर्यंतचा एक मोठा विक्रम असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. सर्वात जलद उड्डाण वेळेचा विक्रम अजूनही लिंकलेटरच्या नावावर आहे.

जीव गेला तरी चालेल, पण Video बनवणारचं! अपघातानंतर डोक्यातून वाहतय रक्त, पण मोबाइल काही सोडला नाही; यूट्यूबरचा धक्कादायक प्रताप

हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात अंदाजे २.७ किलोमीटरचे अंतर कापते. या उड्डाणासाठी ब्रिटन-नॉर्मन BN2B-26 आयलँडर विमान वापरले जाते, ज्यामध्ये १० लोक बसू शकतात. एवढेच नाही तर हे उड्डाण इतके लहान आहे की, पायलटला विमान उडवतानाही त्यात दिसत आहे. पापा वेस्ट्रे बेटावर ७० लोक राहतात, जे त्यांच्या गरजांसाठी या विमानावर अवलंबून आहेत.पण या उड्डाणाने गेल्या वर्षभरात अनेक पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतले आहे, त्यामुळे या सर्वात कमी वेळेत प्रवास करणाऱ्या विमानाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.
??