नवी दिल्लीसह देशाच्या अनेक राज्यात यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दिल्लीत झालेल्या महापूरानंतर आग्रामध्येही यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढलीय. यमुना नदीचं पाणी ताजमहलच्या भिंतीपर्यंत आल्याचं समजते आहे. मागील काही वर्षांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे. यमुनाचं वाढतं पाणी पाहून लोकांना वाटत आहे की, हे पाणी ताजमहलमध्ये शिरेल. ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूचं नुकसान होईल.मात्र, काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यमुना नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढली, तरीही ताजमहलचं काहिच नुकसान होणार नाही. तसंच पूर आल्यावरही ताजमहलमध्ये पाणी शिरणार नाही. याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, पाण्याची पातळी जास्त असल्यावरही ताजमहलमध्ये पाणी शिरणार का नाही?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in