जर तुमच्याकडे अद्यापही पर्मनन्ट अकाऊंट नंबर अर्थात पॅन कार्ड नसेल आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर काही सोप्या सूचनांचं पालन करण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या http://www.incometaxindia.gov या संकेतस्थळावर जा. तेथे पॅन कार्डसाठी फॉर्म 49A भरावा लागतो. भारताबाहेर राहणाऱ्यांसाठीही हिच प्रक्रिया आहे. पण, अनेकजण फॉर्म 49A भरताना चुका करतात आणि त्यामुळे पॅन कार्डसाठी तुम्ही केलेला अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे पॅन कार्डसाठी अर्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

-हा फॉर्म भरताना तुमची स्वाक्षरी चौकटीच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या.

-अर्ज भरताना अर्जदाराच्या नावावर नसलेलं ओळखपत्र किंवा घराचा पत्ता लिहू नये.

-सहीसाठी दिलेल्या चौकटीत तारीख, पद, रँक यांसारखी अनावश्यक माहिती देऊ नका.

-वडिलांचं नाव लिहिण्याच्या ठिकाणी पती किंवा पत्नीचं नाव लिहू नका

-आपण नाव आणि आद्याक्षरांचा संक्षेप वापर टाळावा.

-जर तुमच्याकडे आधी एक पॅन कार्ड असेल तर दुसऱ्यासाठी अजिबात अर्ज करू नका. दोन पॅन कार्ड बाळगणं गुन्हा आहे.

-फॉर्म 49A मध्ये पत्ता लिहिताना पिन कोड चुकीचा लिहू नका. पिन कोडसोबतच फोन नंबर किंवा ई-मेल आयडी अचूक लिहावे.

-फॉर्म 49A भरताना खाडाखोड करु नये

-फॉर्मवर तुमचा फोटो चिकटवलेला चालेल पण त्यासाठी पिन किंवा स्टेपलरचा वापर करु नका

Story img Loader