डिजिटल युगाकडे वाटचाल करीत भारताने एक नवी क्रांती आणली आहे. विशेषत: जेव्हा आपण डिजिटल पेमेंटबद्दल चर्चा करतो तेव्हा आपणाला लोकांनी या नव्या डिजिटलप्रणालीचा वापर करणं स्वीकारल्याचं पाहायला मिळतं. सध्या संपूर्ण जगभरात जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये भारतीयांचं मोठं योगदान असल्याचे म्हटले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण या डिजिटल क्रांतीमध्ये इंजिनीअर्सचे खूप मोठे योगदान आहे. कारण त्यांनी अशी काही अ‍ॅप्स तयार केली आहेत, ज्यामुळे डिजिटल पेमेंट करणे खूप सोपे झाले. यापैकी एक अ‍ॅप म्हणजे QR कोड. क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही हवे तेवढे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज लाखो लोक पैशाचा व्यवहार करतात. भाजीवाल्यापासून ते पेट्रोलपंप आणि मोठमोठ्या मॉलमध्ये लोक QR कोडद्वारे पैसे भरतात. पण हा QR कोड नेमका आहे तरी काय आणि तो कसे काम करतो याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती सांगणार आहोत.

हेही वाचा- लॅपटॉपवर सतत काम केल्यावर डोळ्यांवर काय होतो परिणाम? ‘या’ उपाययोजना करून डोळ्यांच्या समस्येवर करा मात

QR कोड म्हणजे काय?

क्यूआर कोडचा फुलफॉर्म आहे ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ ( Quick Response Code). हा मशीन रीडेबल लेबल्ससारखा असतो, जे संगणकाला इतर कोणत्याही मजकुरापेक्षा लवकर आणि सहज समजते. आजकाल सर्व अनेक ठिकाणी QR कोड वापरले जातात. विशेषतः प्रॉडक्ट ट्रॅक करण्यासाठी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच जाहिराती, बिलबोर्ड आणि बिझनेस विंडोमध्येही या कोडचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचे पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2D बारकोड हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा कोड ठरला आहे. कधीकधी याचा वापर प्रॉडक्टचा डेटा स्टोअर करण्यासाठी केला जातो. परंतु QR कोड डेटा स्टोअर करण्यासाठी एन्कोडिंग मोडचा वापर केला जातो.

कसे काम करतो QR कोड ?

बारकोड ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे QR कोडदेखील काम करतो. परंतु ते दिसायला एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. QR कोडमध्ये बारकोडसारख्या रेषा नसतात तर यामध्ये अनेक डॉट्स असतात. QR कोड दोन प्रकारचे असतात, पहिला स्टॅटिक QR कोड आणि दुसरा डायनॅमिक QR कोड. स्टॅटिक क्यूआर कोड स्थिर असतो, म्हणजेच एकदा तो जनरेट केला तर तो पुन्हा बदलता येत नाही. तर दुसरा, डायनॅमिक क्यूआर कोड गतिशील असतो, म्हणजेच त्यामधील माहिती पुनःपुन्हा अपडेट करता येऊ शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You make a payment by scanning a qr code but do you know the full form how does this code work find out jap
Show comments