जर तुम्ही सापांना जवळून पाहिलं तर त्यांना कान नसल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं तुम्हाला असं वाटेल की, साप आवाज ऐकू शकत नाहीत. पण सापांच्या ऐकण्याच्या क्षमतेनं शास्त्रज्ञांना थक्क करुन ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ क्वींसलॅंडच्या टॉक्सिनोलॉजिस्ट क्रिस्टीना जेडेनेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप कमकूवत आणि घाबरणारे प्राणी असतात. साप बहुतांश वेळा लपून राहतात. सापांच्या बद्दल अजूनही खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं क्रिस्टीना म्हणतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिस्टीना सांगतात की, सापांचे कान त्यांच्या शरीरातील बाहेरच्या भागात नसतात. लोकांना असं वाटतं की, साप ऐकू शकत नाहीत आणि जमिनीवर होणाऱ्या हालचालींनाच ते समजू शकतात. पण, शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार साप बहिरे नसतात. पण त्यांची ऐकण्याची क्षमता इतर शारीरिक अवयव जसं की नाक आणि डोळ्यांमुळे कमी होते. स्लोवेनिया नॅशनल चिडियाघरच्या वेबसाईटनुसार, जरी सापांना बाहेरच्या बाजूस कान नसतात, पण कानाच्या आतील सर्व अवयव त्यांच्यात असतात.

नक्की वाचा – भारतीय रेल्वेच्या सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनलमध्ये काय फरक असतो? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

असा लावला शोध

या संशोधनात १९ वेगवेगळ्या प्रजातिच्या सापांचा समावेश करण्यात आला. यामध्ये मातीत, झाडावर आणि पाण्यात असणाऱ्या सापांचाही समावेश होता. क्रिस्टीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ० ते ४५० हर्ट्ज इतक्या ध्वनीच्या माध्यमातून सापांवर संशोधन केलं. यामध्ये दोन प्रकारचे आवाज सामील होते. जमिनीवर असानाही आवाज येकू येईल आणि हवेत असल्यावरही ऐकू येईल, याबाबत शोध लावण्यात आला.

सापांचा प्रतिसाद कसा होता?

हवेत होणाऱ्या आवाजावर सापांच्या वेगवेगळ्या समुहाने भिन्न प्रतिसाद दिला. तर एकाच प्रकारचं जीन असणाऱ्या सापांनी एकसारखाच प्रतिसाद दिला. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त वोमा अजगरच आवाजाच्या जवळ जात होता. तर इतर साप यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. जगभरातील सापांचा याबाबत कसा प्रतिसाद असेल, याबाबत खात्रीलायक गोष्टींची माहिती नाहीय. पण या संशोधनातून सापांमध्ये ध्वनी संवेदी प्रदर्शन एक महत्वाचा भाग आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You should know about snakes interesting facts can snakes hear new study of scientists reveals shocking things nss