Worlds Longest Air Travel : दळणवळणातील अत्यंत महत्वाचं साधन म्हणजे विमान प्रवास. शेकडो किलोमीटरचा प्रवास विमानाच्या माध्यमातून काही तासांमध्येच पूर्ण केला जाऊ शकतो. जगभरात लाखो प्रवासी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानाने प्रवास करत असतात. आपल्या देशात आजही खूप सारे लोक असे आहेत, ज्यांच्यासाठी विमानातून प्रवास करणं एक स्वप्नच आहे. तर काही माणसांसाठी हा प्रवास कंटाळवाणाही राहिला असेल. जर तुम्हाला एखाद्या विमानात १५ तासांहून अधिक वेळ खर्च करावा लागत असेल, तर तुम्हाला संपूर्ण प्रवासात आनंद वाटेल? कदाचित काही लोकांचं उत्तर असेल, ‘नाही.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील सर्वात लांब विमान प्रवास

विमान प्रवास तर खूप रोमांचक असतो. परंतु, अनेकदा प्रवास लांबचा असल्याने कंटाळवाणा ठरू शकतो. तुम्ही अॅल्यूमिनियमने बनवलेल्या या डब्ब्यात तासंतास कैद होऊन जाता. ना तुम्हाला बाहेरची ताजी हवा मिळते आणि प्राकृतिकदृष्या तुम्हाला फक्त ढगच दिसतात. इथे आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लांब विमान प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

सिंगापूर एअरलाइन्स

सिंगापूरहून न्यूयॉर्कसाठी उड्डाण करणाऱ्या विमानाला जवळपास १५,३४४ किलोमीटर (९,५३४ मील) चे अंतर पार करावे लागते आणि या प्रवासासाठी जवळपास १८ तास ४५ मिनिटांचा कालावधी लागतो.

नक्की वाचा – भारतात ‘या’ ठिकाणी आहे सर्वात मोठा पूल, नट-बोल्टशिवाय उभारलेला पूल रात्री १२ वाजता बंद होतो, कारण…

क्वांटास एअरवेज

पर्थवरून लंडनसाठी जेव्हा विमान उड्डाण करतं, तेव्हा ते जवळपास १४,४९८ किलोमीटर म्हणजेच ९००९ मील इतका दूरचा प्रवास पार पाडत असतं. हा प्रवास करण्यासाठी जवळपास १७ तास २० मिनिंटांचा कालावधी लागतो.

कतार एअरवेज

ऑकलॅंड ते दोहामधील अंतर विमानातून जवळपास ९०३२ मील, म्हणजेच १४,५३५ किलोमीटर आहे. एव्हढ्या लांबचा प्रवास पार करण्यासाठी विमानाला जवळपास १७ तास ४० मिनिटांचा कालावधी लागतो.

अमिरात

ऑकलॅंडवरून दुबईला जाण्यासाठी जवळपास १४,१९३ किलोमीटर म्हणजेच ८,८२४ मील इतकं अंतर पार करावं लागतं. या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमानाला जवळपास १७ तास आणि ५ मिनिटांचा कालावधी लागतो.

युनायटेड एअरलाइन्स

लॉस एंजिल्सवरून सिंगापूरचे अंतर जवळपास ८,७,७० मील म्हणजेच १४,११५ किलोमीटर इतकं आहे. विमानाला या लांबच्या प्रवासाला पूर्ण करण्यासाठी जवळपास १७ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will be shocked after knowing worlds longest flight journey know how much time it takes to land on destination nss