Difference Between Guarantee And Warranty : आपण बाजारात गेल्यावर एखाद्या कंपनीच्या वस्तू खरेदी करतो, त्यावेळी कंपनीकडून त्या प्रोडक्टसाठी एका निश्चित वेळेसाठी गॅरंटी किंवा वॉरंटी दिली जाते. अशाप्रकारचे प्रोडक्ट महागडे नक्कीच असतात, पण त्यांची विश्वासार्हता चांगली असते. गॅरंटी आणि वॉरंटी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खूप जणांना यामधील फरक माहिती नसतो आणि ते दोन्ही गोष्टी सारख्याच असल्याचं समजतात. काही लोकांना यांच्यातील असलेला फरक माहित असतो पण याचा नेमका अर्थ काय आहे, याबाबत त्यांचा गोंधळ उडालेला असतो. आता या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही यामधील असलेला फरक सांगणार आहोत.
वॉरंटी म्हणजे काय?
जेव्हा आपण एखाद्या दुकानात सामान खरेदी करतो आणि त्यावेळी दुकानदार आपल्याला वस्तूंबाबत असलेल्या वॉरंटीबद्दल सागंतो. याचा अर्थ असा की, दुकानदार ग्राहकाला एका निश्चित वेळेसाठी आश्वासन देत असतो. म्हणजेच दिलेली वस्तू त्या निश्चित वेळेआधी खराब झाली, तर तो दुकानदार किंवा विक्रेता विनामुल्य त्या वस्तूची दुरुस्ती करुन देणार. पण या वॉरंटीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खरेदी केलेल्या सामानाचे पक्के बिल असणे आवश्यक असतं.
जर तुम्ही एखादी वॉशिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी केलं आणि त्यासाठी तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी दिलेली
असेल. तर वर्षभरात त्या वस्तूंमध्ये काही बिघाड झाला, तर तुम्ही त्या कंपनीकडून ती वस्तू दुरुस्त करुन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत. पण तुमच्याकडे त्या वस्तूंचा पक्का बिल असल्यावरच तुम्हाला कंपनीकडून वॉरंटीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे वॉरंटी असलेला सामान खरेदी करताना पक्का बिल आणि वॉरंटी कार्ड घेऊन त्याला व्यवस्थित सांभाळून ठेवा.
गॅरंटी म्हणजे काय?
जर एखाद्या ग्राहकाला खरेदी केलेल्या सामानावर एका वर्षाची गॅरंटी दिली असेल आणि त्या निश्चित वेळेत सामान खराब झालं, तर तुम्हाला कंपनीकडून नवीन सामान दिलं जातं. पण गॅरंटी दिलेल्या निश्चित वेळेतच याचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. तसंच ग्राहकाकडे त्या सामानचं पक्क बिल आणि गॅरंटी कार्ड असणं आवश्यक असतं.