आपल्याकडे सरकारी नोकरीला फार महत्त्व आहे. अनेक सुविधा आणि नोकरीची शाश्वती अशा काही कारणांमुळे आजही देशामध्ये सरकारी नोकरीची मोठी क्रेझ पाहायला मिळते. दरवर्षी भारतामध्ये लाखोंच्या संख्येने लोक सरकारी नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईचा कल कन्टेंट क्रिएशन करण्याकडे वळल्याचे पाहायला मिळते. यामुळे पूर्वी करमणूक व्हावी, माहिती मिळावी यासाठी वापरल्या जाणाऱ्या यूट्यूबचा वापर सध्या रोजगार मिळवण्यासाठी केला जात आहे.
जिओच्या डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 4G नेटवर्क आले. पुढे करोना काळामध्ये बहुतांश लोक मजा म्हणून व्हिडीओ बनवायला लागले. त्यातून यूट्यूबर्स आणि कन्टेंट क्रिएटर्सच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. इतर यूट्यूबर्सकडून प्रेरणा घेऊन छत्तीसगढ राज्यातील तुलसी गावामध्ये राहणाऱ्या जय आणि ज्ञानेंद्र या दोन मित्रांनी २०१६ मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली. त्या दोघांना लहानपणापासून अभिनय करायची आवड होती. ते दोघे फावळ्या वेळेमध्ये गमतीशीर व्हिडीओ बनवून यूट्यूबवर शेअर करु लागले. मिळणारा प्रतिसाद पाहून गावातील त्यांचे मित्र त्यांना व्हिडीओ बनवायला मदत करु लागले. पुढे गावातील लहान मुले आणि वयस्कर मंडळी सुद्धा यात सहभागी झाली.
आणखी वाचा – ‘यमराजने भेजा है बचाने के लिए…’ म्हणत एक्सप्रेस वेवर पळवली कार अन् झालं असं काही
या गावामध्ये एकूण ४३२ कुटुंब वास्तव्याला असून या गावाची लोकसंख्या ३००० ते ४००० आहे. जय आणि ज्ञानेंद्र या दोन मित्रांना व्हिडीओ तयार करताना पाहून गावातील इतर लोकांनीही स्वत:चे यूट्यूब चॅनल तयार करायला सुरुवात केली. छत्तीसगडच्या या गावामध्ये तब्बल ४० ते ५० यूट्यूब चॅनल्स आहेत. आज या गावामध्ये १००० पेक्षा जास्त लोक यूट्यूबवर व्हिडीओ बनवून पैसे कमवत आहेत. यामध्ये ५ वर्षांच्या लहान मुलांपासून वयवर्ष ८० असलेल्या आजी-आजोबांचाही समावेश आहे. यूट्यूब चॅनलद्वारे पैसे कमावणाऱ्या या गावाला लोक यूट्यूबर्सचे गाव असे म्हणत आहेत.
आणखी वाचा – Video : मेहबुबा मुफ्तींनी शिवलिंगावर केला अभिषेक, व्हायरल व्हिडिओवर नेटकरी म्हणाले…
सुरुवातीच्या काळामध्ये या गावातील गावकरी साध्या फोनचा वापर करुन व्हिडीओ तयार करत असत. मात्र आता ते व्हिडीओ बनवताना अत्याधुनिक कॅमेरा वापरतात. व्हिडीओ एडिटिंगसाठीही त्यांच्याकडे उत्तमोत्तर सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे गावातील बहुसंख्य लोक त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे दर महिन्याला पैसे कमावत आहेत. यूट्यूब हे त्यांच्या रोजगाराच्या प्रमुख साधनांपैकी एक बनले आहे.