World Expensive Fruit : प्रत्येकाला निरोगी आरोग्यासाठी आहारासोबतच विविध फळांची गरज असते. फळांमधून शरीरास आवश्यक व्हिटॅमिन्स मिळत असतात जे पोटाचे विकार आणि इतर अनेक आजारांविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती देतात. यामुळे आजारपणातही व्यक्तीला विविध फळ किंवा फळांचा ज्यूस दिला जातो. पण आजवर तुम्ही जगातील सर्वात महाग फळं कधी पाहिल आहे का? किंवा त्या फळाचे नाव तुम्हाला माहित आहे का? नाही ना.. त्यामुळे तुम्हाला जगातील सर्वात महागड्या फळाबद्दल सांगणार आहोत. वास्तविक हे फळ अगदी खरबूजासारखे दिसते.
नुकताच सोशल मीडियावर एका युजरने जगातील सर्वात महागड्या फळाबद्दल विचारणा केली होती. ज्यानंतर हे फळ चर्चेत आले आहे. या फळाचे नाव युबरी खरबूज असे आहे जे दिसायलाही अगदी खरबूजासारखे आहे.
युबरी खरबूज फळाची लागवड ही बहुतांश जपानमध्ये केली जाते, एका मीडिया रिपोर्टमध्ये जपानच्या अधिकृत वृत्तसंस्थेचा हवाला देत या फळाबद्दल असे सांगण्यात आले की, या फळाचा आतील भाग हा केशरी रंगाचा असतो आणि बाहेरील भाग हिरवा असतो. या फळावर काही पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. म्हणजे हे फळ जवळपास भारतात आढळणाऱ्या खरबुजासारखेच दिसते.
फक्त ग्रीन हाऊस गॅसमध्येच होते याची शेती
या फळाबाबत आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची लागवड सामान्य फळांप्रमाणे करता येत नाही. कारण हे फळ सूर्यप्रकाशात वाढू शकत नाही. ते फक्त ग्रीन हाऊस गॅसमध्येच वाढू शकते. याशिवाय ते फळ व्यवस्थित वाढण्यासाठी १०० दिवस लागतात.हे फळ साधारण फळांच्या दुकानात मिळत नाही. या फळाचे उत्पादन फक्त जपानच्या युबारी भागातच घेतले जाते. कदाचित त्यामुळेच या फळाला असे नाव पडले आहे.
फळाची किंमत सर्वात जास्त
या फळाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय रुपयांमध्ये या फळाची किंमत 10 लाख रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या फळाचे काही किलोग्राममध्येचं उत्पादन घेतले तरी एखादी व्यक्ती करोडपती होईल. पण भारतासारख्या देशात हे फळ वाढवणे अशक्य आहे कारण त्याची किंमत देखील त्यानुसार खूप जास्त असेल.