महिंद्राची आटोपशीर ‘व्हेरिटो व्हिबे’
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने व्हेरिटो व्हिबे ही आटोपशीर मोटार चंडिगड येथे सादर केली. पंजाबमधील ग्राहकांना त्यात डोळ्यासमोर ठेवले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शाह यांनी सांगितले की, या मोटारीला रेनॉल्टचे दीड लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन असून ती लिटरला २०.८ कि.मी. अंतर जाते. टिकायलाही ही मोटार चांगली आहे. यात अत्याधुनिक अशी चालक माहिती यंत्रणा आहे, ज्यामुळे मायलेज, तापमान, कापलेले अंतर या सगळ्या बाबी कळतात. फॅमिली मोटार म्हणून ती बाजारात आणली आहे. स्टाइल, जागा, सुरक्षा व इंजिनाची क्षमता यात ही गाडी उच्च मानक पूर्ण करणारी आहे. तिची किंमत डी २ मॉडेलसाठी ५.७२ लाख, तर डी ६ मॉडेलसाठी ६.५८ लाख इतकी आहे. भारतीय रस्त्यांवर ती बिनदिक्कतपणे धावू शकते. अॅक्वा रश या नवीन रंगासह एकूण सात रंगांत ती उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा