जुनं ते सोनं अशी आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. जुन्या वस्तूंचा संग्रह करून त्याची नव्यांशी तुलना करून असं म्हणता येतं. मात्र, काळानुरूप सारं काही बदलत असतंच. बजाजच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. एकूणच तरुणाईचा कल कुठल्या बाजूने आहे, याचा कानोसा घेत त्यांनी सध्या दुचाकी बाजारात आणण्याचा धडाका लावला आहे. पल्सरच्या बाबतीत तसेच म्हणावे लागेल. पल्सर मालिकेच्या यशानंतर आता बजाजाने अॅव्हेंजरची ब्रँड न्यू सीरिज बाइकप्रेमींसाठी पेश केली आहे. अर्थात जुन्या अॅव्हेंजरमध्ये फेरफार करूनच नव्या १५० स्ट्रीट, २२० स्ट्रीट आणि २२० क्रूझ या तीन नव्या गाडय़ा बजाजने आणल्या आहेत. यातील २२० क्रूझ ही तर भन्नाटच आहे. ती नक्कीच तरुणाईला आकर्षति करणारी आहे, यात शंका नाही. १५० आणि २२० स्ट्रीट यांची ऐटही आहेच, त्यामुळे नवं ते सोनं म्हणायला हरकत नाही..
अॅव्हेंजर मालिकेतील १५० आणि २२० स्ट्रीट आणि २२० क्रूझ या तीनही गाडय़ा सलग तीन दिवस चालवायला मिळणे आणि तेही हायवेला, ही कोणत्याही बाइकप्रेमीसाठी पर्वणीच.. तशी ती आम्हाला मिळाली. या तीनही गाडय़ांची खासियत काय, त्या हायवेला पळतात कशा, शहरात त्या कशा धावतात, मायलेज किती देतात, सस्पेन्शन कसे आहे, जुन्या आणि नव्या अॅव्हेंजरमध्ये फरक काय आहे, वगरेचा अनुभव घेता आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा