बारावीच्या सुट्टीमध्ये गाडी शिकायला सुरुवात केली. घरच्या ड्रायव्हरने प्राथमिक माहिती सांगून हातात स्टियिरग दिले व तो बाजूच्या सीटवर बसला. प्रथम एका मोकळ्या मदानात चालवून रस्त्यावर गाडी आणली. उजवीकडे दूर एक टपरी होती आणि गाडीचा स्पीड वाढविताना ती आता कंट्रोल कशी करायची हे लक्षात न आल्याने आता गाडी टपरीवर धडकणार ही शक्यता बघून,” काका, ब्रेक मारा” अशी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. काका म्हणाले,” ब्रेक तुझ्या पायाजवळ आहे.” आणि मग पतीराजांनी गाडी कंट्रोलमधे घेतली. हा ‘कार’कीर्दीचा पहिला प्रतापी दिवस. त्यानंतर मात्र हळूहळू आत्मविश्वास वाढला आणि लग्नानंतर पतिदेवानी गाडी तर नीट व्यवस्थित चालवता आलीच पाहिजे असे सांगून को ड्रायव्हिंग सीट पकडली आणि मी कायमचीच सारथी बनले. पहिल्यांदा गरज, नंतर आवड आणि आता पॅशनमध्ये रूपांतरित झालेले हे ड्रायव्हिंग मनसोक्त आनंद देतेच, पण दुसऱ्यांना प्रेरणादायी ठरते. मारुती ८००, झेन, फिएस्टा, फिगो,उनो, होंडा सिटी,आणि सध्याची पतीराजांनी वाढदिवसाला भेट दिलेली ईको स्पोर्ट, आतापर्यंतच्या माझ्या प्रवासाच्या मत्रिणी ठरल्या. सुंदर रस्ते, रमणीय वातावरण, जगजीतच्या गज़्ाला, पावसाळा वातावरण आणि लाँग ड्राइव्ह यामुळे कोकण, महाराष्ट्र, गुजरात आतापर्यंत मनमुराद भटकून झालोय.
दरवेळी जुनी कार विकताना मात्र, घेणाऱ्यांना एक गोष्ट खास सांगते ,‘‘जपा हं, हिला.’’. जसं काही लेकीची पाठवणी सासरी होतेय. एकदा भर पावसात घाट उतरताना ट्राफिक जाम मध्ये गाडी अडकली. खाली उतरून इतर गाडय़ांना सूचना देऊन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत होते तर दुसऱ्या गाडीतील कॉलेजवयीन मुलाने विचारले, ‘‘ताई, साहेब बाजूला बसलेत, त्यांना येतेय ना गाडी चालवता, मग सांगा ना चालवायला.’’ त्याला काय सांगू,‘‘बाबा, मला ड्रायिवग एक्सपर्ट बनवून, विश्वासानेच तो माणूस बसलाय.’’ दरवेळी प्रवासाच्या अंती नवऱ्याची कौतुकाची शाबासकी आणि, ‘‘माझी आई जगात कुठेही गाडी चालवू शकेल’’ हे मुलाचे प्रशस्तिपत्र मात्र ऐकायला खूप आवडते.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2015 रोजी प्रकाशित
‘कार’कीर्दीचा प्रतापी दिवस
बारावीच्या सुट्टीमध्ये गाडी शिकायला सुरुवात केली. घरच्या ड्रायव्हरने प्राथमिक माहिती सांगून हातात स्टियिरग दिले व तो बाजूच्या सीटवर बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-05-2015 at 09:20 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car in my memory