गेल्याच महिन्यात नवी दिल्लीत पार पडलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये शो स्टॉपर ठरलेली मारुती सुझुकी सेलेरिओ अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. भारताची पहिलीवहिली ऑटो गीअर शिफ्ट कार असलेल्या सेलेरिओला वाढती मागणी असून महिनाभरातच १५ हजारांहून अधिक सेलेरिओंची विक्री झाली आहे. अवघ्या चार लाखांत उपलब्ध असलेली ही हॅचबॅक मारुतीच्या आतापर्यंतच्या सर्व गाडय़ांच्या तुलनेत सर्वात लोकप्रिय ठरण्याच्या मार्गावर आहे. या पाश्र्वभूमीवर सेलेरिओचा घेतलेला आढावा..

गीअर्स
ऑटो गीअरशिफ्ट प्रणाली असल्याने सेलेरिओ अधिकाधिक ग्राहकस्न्ोही ठरली आहे. या प्रणालीला ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन असे नावही देण्यात आले आहे. त्यामुळे गीअर शिफ्ट करताना वापरकर्त्यांला कोणताही त्रास होत नाही, अगदी स्मूदली हे काम होते आणि ड्रायिव्हगचा आनंद लुटता येतो. हायड्रॉलिक सिस्टीममुळेही क्लचच्या वापराविना गीअर शिफ्ट करता येत असल्याने ड्रायिव्हगच्या आनंदात अधिकच भर पडते.

इंजिन क्षमता
अल्टो के१० सारखेच सेलेरिओलाही के सीरिजचेच इंजिन आहे. एक लिटरची क्षमता आणि तीन सििलडर असलेल्या या इंजिनाची क्षमता ९९८ सीसीची आहे. अ‍ॅॅल्युमिनियम धातूने त्याची रचना करण्यात आली असल्याने इंजिन लवकर थंड होऊ शकते. के-१०बी इंजिन असल्याने मारुतीच्याच इतर गाडय़ांच्या तुलनेत सेलेरिओची इंधनक्षमता पाच टक्क्यांनी अधिक वाढली आहे.

मायलेज
फक्त पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध असलेल्या सेलेरिओचा मायलेज प्रतिलिटर २३ किमी आहे. अर्थातच पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या पाश्र्वभूमीवर एवढा मायलेज नक्कीच ग्राहकस्न्ोही आहे. त्यामुळे इंधनस्न्ोही असलेल्या सेलेरिओला ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे हॅचबॅक सेगमेंटमधील स्पर्धकांनी सेलेरिओचा धसका घेतला तर आश्चर्य वाटायला नको.

अंतर्गत सुविधा
पहिली गोष्ट म्हणजे आतून गाडी स्पेशियस आहे. अगदी पाचजण आरामात बसू शकतील एवढी जागा देण्यात आली आहे. शिवाय पुढे बसणा-याला बूट स्पेसही पुरेसा आहे. त्यामुळे उगाचच आखडून बसण्यासारखी परिस्थिती नाही. याशिवाय तब्बल सव्वादोनशे किलो वजनाचे लगेज तुम्ही गाडीत टाकू शकता. ब्ल्यूटूथ इंटिग्रेटेड ऑडिओ सिस्टीम बरोबरच चांगल्या प्रतीचे स्पीकर्स गाडीत आहेत. तसेच तुम्ही तुमच्या आवडीच्या गाण्यांसाठी तुमच्याकडील आयपॉड किंवा मोबाइल्सही ऑडिओ सिस्टीमला जोडू शकता. आवाज कमीजास्त करण्यासाठीचे नियंत्रण स्टिअिरगला जोडण्यात आले आहे.

ब्रेकिंग सिस्टीम
सेलेरिओची ब्रेकिंग सिस्टीम उत्तम आहे. फ्रन्ट आणि रिअर ब्रेकसह अँटी लॉकिंग ब्रेक सिस्टीमही यात आहे. त्यामुळे इझी ड्राइव्हचा आनंद मिळतो.

सुरक्षाप्रणाली
सेलेरिओच्या बेसिक मॉडेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने फारशा सुविधा नाहीत. मात्र, मारुतीच्या ए-स्टारपेक्षा सेलेरिओ नक्कीच सुरक्षित आहे. गाडीच्या टपाची उंची वाढवली असल्याने गाडी चालवताना रस्त्याचा पुढील भाग व्यवस्थित दिसतो. उच्च प्रतीच्या स्टीलच्या वापरांनी दारे बनवली असल्याने तेही सुरक्षित प्रवासाची हमी देतात. सेलेरिओच्या हाय एन्ड प्रकारांत चालक आणि सह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग्जची सुविधा उपलब्ध आहे.

या रंगांमध्ये उपलब्ध
ब्लेिझग रेड, सेरुलियन ब्ल्यू, केव्ह ब्लॅक, सनशाइन रे, ग्लिस्टिनग ग्रे, सिल्की सिल्व्हर, पर्ल आíक्टक व्हाइट.

स्मार्ट युटिलिटी स्पेस
ग्लोव्ह बॉक्स, अर्धा लिटरच्या दोन बाटल्या ठेवता येतील असे बॉटल होल्डर्स, दोन रिअर बॉटल होल्डर्स, मॅप पॉकेट्स, ड्रायव्हर साइड पॉकेट्स, आयपी सेंटर पॉकेट, सनव्हायजरमध्ये तिकीट होल्डर, रिअर पार्सल ट्रे.

Story img Loader