इंजिनाची शक्ती मोजण्याचे परिमाण कोणते?
– श्रीनिवास टोणगे, कोल्हापूर
* इंजिनातून निर्माण होणारी शक्ती अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) या परिमाणाने मोजतात. एक अश्वशक्ती ही ७४६ किंवा ७३५ वॅटइतकी असते. आपण साधारणत: ऐकताना एचपीमध्ये म्हणजेच हॉर्स पॉवरमध्ये असते. इंजिनमधून निर्माण होणारी शक्ती ही सर्वच्या सर्व वेग घेण्यासाठी वापरली जात नाही. तिच्यातून काही प्रमाणात शक्तीचा क्षय होतो. हा क्षय म्हणजे फ्लायव्हील, घर्षण इत्यादीमध्ये परावíतत होणारी शक्ती. ही कमी होणारी अश्वशक्ती मूळ अश्वशक्तीतून वजा केली असता बीएचपी म्हणजेच ब्रेक हॉर्स पॉवर मिळते. कारची शक्ती मोजण्याचे खरे परिमाण म्हणजे बीएचपी होय.
टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक इंजिनमध्ये काय फरक असतो ? – सागर कारंडे, पनवेल
* खरेतर टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक या दोन्ही प्रकारच्या इंजिनमध्ये अनेक बाबी वेगळ्या आहेत. जसे की रचना, व्हॉल्यूम (घनफळ ), इंधन पुरवठा यंत्रणा, शक्ती निर्माण करण्याचे प्रमाण इत्यादी टू स्ट्रोक इंजिनमध्ये पिस्टन हा हवा आणि इंधन मिश्रणावर दाब निर्माण करत वपर्यंत येतो आणि इंजिनमध्ये स्पार्क झाल्यानंतर शक्ती निर्माण होते आणि पिस्टन वेगाने खाली ढकलला जातो आणि यामध्ये दोन स्ट्रोक होतात. फोर स्ट्रोकमध्ये अगोदर पिस्टन वरच्या लेव्हलपासून खाली येतो तेव्हा इंधन आणि हवा आतमध्ये खेचली जाते. पिस्टन वर जाताना मोठा दाब निर्माण करतो त्यानंतर स्पार्क होऊन शक्ती निर्माण होते आणि पिस्टन खाली येतो आणि शेवटी परत वर जाताना राहिलेला धूर बाहेर ढकलतो असे चार स्ट्रोक होतात. फोर स्ट्रोक मध्ये इंधन जास्त वाया जात नाही त्यामुळे कार्यक्षमता वाढते.
व्हॉल्व्ह टायिमग म्हणजे काय? ते महत्त्वाचे का असते ? – किरण देशमुख, सातारा
* इंजिन चेंबरमध्ये इंधनाचा पुरवठा करण्याचे एक टायिमग असते. आणि त्या टायिमगलाच व्हॉल्व्हची उघडझाप होण्याची प्रोसेस होते यालाच व्हॉल्व्ह टायिमग असे म्हणतात. पिस्टन खाली जाताना इंधन आणि हवा यांचे मिश्रण खेचून घेत असतो त्या वेळी इनलेट व्हॉल्व्ह हा ओपन असायलाच हवा. जेव्हा स्पार्क होऊन इंधनाचे ज्वलन होते तेव्हा दोन्ही व्हॉल्व्ह बंद हवे. आणि पिस्टन खाली जाऊन परत वारच्या पातळीवर येईल तेव्हा एक्झॉस्ट व्हॉल्व्ह उघड हवा कारण तेव्हा पिस्टन सगळा धूर (एक्झॉस्ट गॅसेस) बाहेर ढकलत असतो. या सर्व क्रिया त्या त्या वेळीच होणे अपेक्षित असते. असे न झाल्यास इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो.
इंजिनमध्ये ओइल बर्निंग होत आहे, उपाय सांगा – संतोष शिंदे, नाशिक
* पिस्टनचा वरचा पृष्ठभाग हा इंधनाचे ज्वलन सहन करतो. आणि पिस्टनच्या खालच्या भागात ऑइल असते या दोन्ही कार्य होणाऱ्या भागांना पिस्टन रिंग वेगळे ठेवतात. खालून पंपातून येणारे ऑइल हे कम्बश्चन चेम्बरमध्ये जाऊ न देण्याचे काम पिस्टन रिंगचे असते. पिस्टन रिंग जर झिजल्या असतील तर कॉम्प्रेशन प्रेशर कमी होते आणि ऑइल चेम्बरमध्ये जाऊन त्याचे इंधानासोबत ज्वलन होते म्हणून पिस्टन रिंगची काळजी घ्यावी जेणेकरून झीज कमी व्हावी आणि गरज असल्यास बदलावी.
कारनामा
इंजिनातून निर्माण होणारी शक्ती अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) या परिमाणाने मोजतात. एक अश्वशक्ती ही ७४६ किंवा ७३५ वॅटइतकी असते. आपण साधारणत: ऐकताना एचपीमध्ये म्हणजेच हॉर्स पॉवरमध्ये असते.
First published on: 16-10-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common car troubles their causes and solutions