- मेष:-
कर्मठपणे आपले मत दर्शवाल. वडीलधाऱ्यांचा आदर करावा. बुद्धीची प्रगल्भता दाखवावी. शासकीय कामे होतील. चुकीच्या गोष्टीचा विरोध कराल. - वृषभ:-
उगाचच खचून जाऊ नये. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वेळच्यावेळी औषधोपचार करावेत. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. चिकाटी धरून ठेवावी. - मिथुन:-
शांतपणे आपले मत नोंदवाल. नवीन पद्धतीचा वापर करावा. आधुनिक बाजू जाणून घ्यावी. जोडीदाराचे कौतुक कराल. घरगुती प्रश्न समर्थपणे सोडवाल. - कर्क:-
गैरसमजुतीत अडकू नका. कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करावा. संसर्गजन्य विकार संभवतात. हाताखालील लोकांकडे लक्ष ठेवा. कामात सातत्य ठेवावे लागेल. - सिंह:-
व्यावहारिकता जपाल. धोरणीपणे विचार कराल. कामात दीर्घ चिकाटी ठेवाल. तुमच्या बुद्धीचे कौतुक केले जाईल. अविश्वास दाखवू नका. - कन्या:-
वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे. काही कामात जरा अधिक कष्ट पडतील. विचार भरकटू देऊ नका. कामातील उत्साह वाढेल. अति कामामुळे थकवा जाणवेल. - तूळ:-
खोलवर विचार कराल. मनन, चिंतन करण्यावर भर द्याल. पराक्रमाला वाव आहे. स्वकर्तृत्वावर भर देऊन वागाल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. - वृश्चिक:-
सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत फार विचार कराल. शक्यतो मोजकेच बोलाल. कंजूसपणा कराल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. - धनु:-
प्रौढपणे वागाल. निराश होण्याचे काही कारण नाही. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. काही बदलांकडे सकारात्मकतेने बघावे. सरकारी कामे करण्यात वेळ जाईल. - मकर:-
कामातील उशिराने वैतागून जाऊ नये. योग्य संधीची वाट पाहावी. प्रयत्नात कसूर करू नका. निराशेला मनातून बाजूला सारावे. आध्यात्मिक बळ वाढवावे. - कुंभ:-
गुंतवणुकीचा योग्य पर्याय शोधाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. व्यवहारिक विचार कराल. नवीन मित्र जोडावेत. एकाच बाजूने विचार करू नका. - मीन:-
अहंपणे विचार करू नयेत. चुकीच्या कल्पना बाजूला साराव्यात. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. परिस्थितीनुरूप वागाल. वडिलांशी जुळवून घ्यावं.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, रविवार, ०६ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 06-10-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 06 october 2019 aau