- मेष:-
कर्मठपणे आपले मत दर्शवाल. वडीलधाऱ्यांचा आदर करावा. बुद्धीची प्रगल्भता दाखवावी. शासकीय कामे होतील. चुकीच्या गोष्टीचा विरोध कराल. - वृषभ:-
उगाचच खचून जाऊ नये. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वेळच्यावेळी औषधोपचार करावेत. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. चिकाटी धरून ठेवावी. - मिथुन:-
शांतपणे आपले मत नोंदवाल. नवीन पद्धतीचा वापर करावा. आधुनिक बाजू जाणून घ्यावी. जोडीदाराचे कौतुक कराल. घरगुती प्रश्न समर्थपणे सोडवाल. - कर्क:-
गैरसमजुतीत अडकू नका. कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करावा. संसर्गजन्य विकार संभवतात. हाताखालील लोकांकडे लक्ष ठेवा. कामात सातत्य ठेवावे लागेल. - सिंह:-
व्यावहारिकता जपाल. धोरणीपणे विचार कराल. कामात दीर्घ चिकाटी ठेवाल. तुमच्या बुद्धीचे कौतुक केले जाईल. अविश्वास दाखवू नका. - कन्या:-
वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे. काही कामात जरा अधिक कष्ट पडतील. विचार भरकटू देऊ नका. कामातील उत्साह वाढेल. अति कामामुळे थकवा जाणवेल. - तूळ:-
खोलवर विचार कराल. मनन, चिंतन करण्यावर भर द्याल. पराक्रमाला वाव आहे. स्वकर्तृत्वावर भर देऊन वागाल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. - वृश्चिक:-
सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत फार विचार कराल. शक्यतो मोजकेच बोलाल. कंजूसपणा कराल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. - धनु:-
प्रौढपणे वागाल. निराश होण्याचे काही कारण नाही. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. काही बदलांकडे सकारात्मकतेने बघावे. सरकारी कामे करण्यात वेळ जाईल. - मकर:-
कामातील उशिराने वैतागून जाऊ नये. योग्य संधीची वाट पाहावी. प्रयत्नात कसूर करू नका. निराशेला मनातून बाजूला सारावे. आध्यात्मिक बळ वाढवावे. - कुंभ:-
गुंतवणुकीचा योग्य पर्याय शोधाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. व्यवहारिक विचार कराल. नवीन मित्र जोडावेत. एकाच बाजूने विचार करू नका. - मीन:-
अहंपणे विचार करू नयेत. चुकीच्या कल्पना बाजूला साराव्यात. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. परिस्थितीनुरूप वागाल. वडिलांशी जुळवून घ्यावं.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, रविवार, ०६ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 06-10-2019 at 00:02 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 06 october 2019 aau