प्रत्येक कारप्रेमीच्या स्वप्नातील कार म्हणजे रोल्स रॉइस. ही ड्रीम कार सहजासहजी कोणालाही मिळत नाही. तिच्यासाठी खास मागणी करावी लागते. अशा या रोल्स रॉइसने आता डॉन ही नवीन कन्व्हर्टबिल सुपर लक्झरी कार सादर केली आहे. नुकतेच तिचे ऑनलाइन लाँचिंग झाले. रोल्स रॉइसचे खास कोच दरवाजे त्यांच्या स्वत:च्या रूपात पुन्हा एकदा ड्रॉपहेड प्रकारात आले आहेत.

* यातील कोच दरवाजे आकर्षक व सुंदर आहेत. या दरवाजासोबत लांब फ्रंट विंग्स आणि आरामदायी वाफ्ट लाइन असून त्यातून एक लांब बॉडी प्रोफाइल आणि कॉसेट केलेले केबिन तयार केले गेले आहेत.
* डॉनमध्ये लाकूड आणि लेदर यांच्या अत्यंत सुंदर आलिशान व देखण्या रूपात वसलेल्या चार वेगवेगळ्या बकेट सीट्स आहेत.
* वरील सीटच्या मागील बाजूमध्ये सीटबेल्ट आहेत.
* डॉनच्या ८ स्पीड झेडएफ गीअर बॉक्समधून सर्वाधिक योग्य गीअरचा वापर करण्यासाठी या माहितीचा वापर केला जातो आणि त्यातून चालकाला रोल्स रॉइस ६.६ लिटर ट्विन टबरे व्ही१२ च्या ताकदीचा योग्य वापर करता येईल आणि कोणत्याही त्रास तसेच अडथळ्याविना गाडी चालवण्याचा अनुभव घेता येईल, याची काळजी घेतली जाते.

Story img Loader