निस्सान टेरानो
रोल्स रॉइस आणि ऑडीपाठोपाठ निस्सानने नव्या गाडीच्या लाँचिंगचा नंबर लावला आहे. निस्सानच्या टेरानो या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे मंगळवारीच लाँचिंग झाले. रेनॉच्या डस्टर एसयूव्हीला टक्कर देण्यासाठी टेरानोची निर्मिती करण्यात आली आहे. डस्टर आणि टेरानो यांच्या किमतीत फारसा फरक नाही. तसेच डस्टरला डोळ्यासमोर ठेवूनच टेरानोची निर्मिती करण्यात आली आहे, असे म्हणायला वाव आहे. निस्सानच्या इतर एसयूव्हींच्या तुलनेत टेरानोच्या निर्मितीसाठी वेगळ्या शिटमेटलचा वापर करण्यात आला आहे. या गाडीची किंमत दहा लाखांच्या आत असून टेरानो प्रत्यक्षात रस्त्यावर धावायला बहुधा ऑक्टोबर उजाडेल.

बीएमडब्ल्यू
एन्ट्री लेव्हल कारच्या बाजारात सध्या गळेकापू स्पर्धा निर्माण झाली आहे. या सेगमेंटमध्ये जवळपास प्रत्येक ऑटो कंपनी उतरली असल्यामुळे ग्राहकांना विविध ब्रँडचा मुक्तपर्याय उपलब्ध झाला आहे. त्यात आता बीएमडब्ल्यू वन सीरिजचा समावेश होतो आहे. बीएमडब्ल्यूचे एन्ट्री लेव्हल कार मॉडेल ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात लाँच होत आहे. शिवाय या गाडीचे उत्पादन बीएमडब्लूच्या चेन्नईतील प्लांटमध्येच होणार आहे, त्यामुळे किमतीत फार काही वाढ होणार नाही. वन सीरिजची ही एन्ट्री लेव्हल कार २० ते २५ लाखांदरम्यान असेल, असा अंदाज आहे. हॅचबॅक प्रकारातली ही गाडी प्रस्थापितांना चांगलीच टक्कर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

श्रावण आता काही दिवसांतच संपेल. गणेशभक्तांना आतापासूनच गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. सणासुदीचा हंगाम आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. हा फेस्टिव्ह मूड साधण्यासाठी बाजारातही विविध कंपन्या नवनवी उत्पादने घेऊन येत आहेत. त्याला ऑटो सेक्टरही कसे अपवाद राहील? बाजारातील मंदी, घसरत्या रुपयामुळे वाढत असलेले उत्पादनमूल्य, मागणी कमी, उत्पादन जास्त, रिकॉिलगची साडेसाती या सर्व नकारात्मक परिस्थितीतही सर्व मरगळ झटकून नवनव्या गाडय़ा या मोसमात लाँच होणार आहेत. रोल्स रॉइस आणि ऑडी क्यू ३ एस यांचे लाँचिंग झालेही.. एकूणच ग्राहकांवर नव्या गाडय़ांसह आकर्षक योजनांची बरसातच होणार आहे..

ह्य़ुंडाई ग्रँड आय १०
आय१० आणि आय २० च्या यशानंतर ह्य़ुंडाई पुन्हा आता ग्रँड आय १० ही हॅचबॅक प्रकारातली गाडी आणत आहे. गणेशोत्सवाच्या आसपास ग्रँड आय १० लाँच होईल. सध्याच्या आय१०चाच हा विस्तारित प्रकार असेल. प्रस्तावित किंमत चार लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांत ती उपलब्ध असेल.

क्यू३एस
ऑडीची क्रेझ कोणाला नसते? त्यामुळेच ऑडीचे कोणतेही मॉडेल बाजारात येवो, त्याची हमखास विक्री होतेच; मात्र तरीही ऑडीला सध्या मर्सडिीझ बेन्झ आणि बीएमडब्ल्यू यांच्याकडून तीव्र स्पध्रेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच की काय ऑडीने किंमत थोडी कमी करत क्यू3एस हे नवीन मॉडेल लाँच केले आहे. काल-परवाच बाजारात आलेल्या या गाडीची किंमत आहे २५ लाख रुपये. ही एसयूव्ही आहे क्यू3 परंपरेतली. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या क्यू3 पेक्षा या गाडीच्या तुलनेत हिच्यातील फीचर्स कमी आहेत. म्हणजे हिची किंमत क्यू3 पेक्षा साडेतीन लाखांनी कमी आहे. शिवाय क्यू3एस मॅन्युअल ट्रान्समिशनवर पळते, तसेच तिच्या पुढच्या बाजूस एलईडी लाइट्स नाहीत की सनरूफही नाही. सहा मॅन्युअल गीअर्स असलेल्या या गाडीची किंमत मुद्दामच २५ लाखांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. जेणेकरून मर्सडिीझ बेन्झच्या ए आणि बी क्लासला ती टफफाइट देऊ शकेल!

मारुती स्टिगरे
नवनवीन गाडय़ांच्या स्पध्रेत आपले स्थान टिकवण्याच्या आटोकाट प्रयत्नात असलेल्या मारुतीने, िस्टगरे ही वॅगनआरची सुधारित आवृत्ती बुधवारी लाँच केली. िस्टगरेची किंमत सव्वाचार लाखांपासून सुरू होईल. वॅगन आरच्या बाह्य़रूपात थोडा बदल करून िस्टगरेची निर्मिती करण्यात आली आहे. बोनेट सपाट, स्लीम आकाराचे हेडलॅम्प्स, सुधारित स्वरूपातील फॉग लॅम्प्स, आतमध्ये बसण्यासाठी विस्तारित जागा वगरे अशी या गाडीची वैशिष्टय़े  आहेत. सध्याच्या वॅगन आरपेक्षा ही गाडी थोडी अधिक ४० ते ५० हजारांनी महाग असेल.

व्रेथ
राजेराजवाडय़ांच्या काळात.. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील विविध संस्थानांचे संस्थानिक ही रोल्स रॉइसची हक्काची बाजारपेठ होती. त्यांचा आब राखण्यासाठी तसेच त्यांच्या खानदानी श्रीमंतीत मानाचा आणखी एक तुरा खोवण्यासाठी त्यांच्या दारात महागडी रोल्स रॉइस आणून ठेवणे हे या ब्रिटिश कंपनीचे आद्यकर्तव्य असायचे. मात्र स्वातंत्र्यानंतर रोल्स रॉइसने भारतातून काढता पाय घेतला; परंतु भारतातील प्रचंड बाजारपेठेचे महत्त्व लक्षात येताच २००५ मध्ये पुन्हा रोल्स रॉइसने भारतीय बाजारपेठेत शिरकाव केला. आतापर्यंत केवळ दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तीन ठिकाणीच रोल्स रॉइसची डीलरशिप होती. मात्र आता अहमदाबाद आणि चंडिगढ या ठिकाणीही रोल्स रॉइस डीलरशिप सुरू करणार आहे. भारतातील मिलियनर्स आणि बिलियनर्सची वाढती संख्या पाहूनच कंपनीने हा निर्णय घेतला आहे. साडेचार कोटींच्या व्रेथचे लाँचिंग सोमवारीच मोठय़ा दिमाखात पार पडले. मार्च महिन्यात जीनिव्हात झालेल्या मोटार शोमध्ये साडेचार कोटी रुपये किमतीची (दिल्लीतली किंमत आणि तीही एक्स शोरूम) व्रेथ प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. ऑटो उद्योगासाठी सध्या भारतातील वातावरण फारसे उत्साहवर्धक नसले तरी व्रेथला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला आशा आहे.

क्रॉसपोलो
फोक्सवॅगनच्या पोलोला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता याच हॅचबॅक प्रकारातील पुढचे व्हर्जन आणण्याचा फोक्सवॅगनचा विचार आहे. क्रॉसपोलो असे नामकरण असलेली ही गाडी लवकरच लाँच होईल, अशी आशा आहे. सध्याच्या पोलो टीडीआय हायलाइनपेक्षा ही अंमळ महाग असेल. पोलो टीडीआयपेक्षा क्रॉसपोलोची इंजिन क्षमता अधिक असेल, तसेच तिचे इंटिरियर आणि एक्स्टेरियरही बदललेले असेल.

Story img Loader