माझ्या मुलाने पुण्याला असताना मारुती व्ॉगन-आर कार घेतली होती. दोन वर्षांनी तो अमेरिकेला गेला. त्या वेळी कार आमच्या डोंबिवली येथील घरी आणून ठेवली.त्या वेळी सर्व मित्रांनी सल्ला दिला की, कार नुसती ठेवली तर खराब होईल. तेव्हा मी विचार केला, आपणच कार शिकलो तर?
माझे कार शिकण्याचे निश्चित झाले, तेव्हा परत मित्रांचे सल्ले सुरू झाले. या वयात कार शिकणे फार कठीण आहे. तुझा तसेच रस्त्यावरील लोकांचा तरी विचार कर, कारण त्या वेळी माझे वय ५८ होते; परंतु माझा निर्णय पक्का होता. कार शिकण्यासाठी ड्रायिव्हग स्कूलमध्ये चौकशीसाठी गेलो. तेथील मॅडमनी मला विचारले की, तुमच्या मुलाला ड्रायिव्हग शिकायचे आहे का? मी म्हटले, मला शिकायचे आहे. मला जमेल ना? मॅडमनी माझ्या उत्साहाला दाद दिली व म्हणाल्या, काका, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला नक्कीच जमेल. अशा रीतीने ट्रेिनग सुरू झाले.
ट्रेिनगचे एबीसी सुरू झाले. अ‍ॅक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच. त्याशिवाय गीअर वेगळाच. हातापायांची कसरत सुरू झाली. पहिल्या दिवशी अ‍ॅक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच कसे व कधी वापरायचे, इत्यादी ट्रेिनग सुरू झाले. पहिल्या दिवशी एक छोटा राऊंड मारला. खूप मजा आली. असे वाटले की, कार चालवणे एवढे कठीण नाही. वीस दिवसांचे ट्रेिनग संपले. आता स्वत:च कार चालवण्याचा सराव करायचा होता.
पहिल्याच दिवशी रात्री सर्व झोपल्यावर कार चालू केली. अ‍ॅक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच व गीअरचा वापर करून हळूहळू कार सुरू केली, पण कार सुरू होताना आचके देऊन बंद होत होती. हळूहळू क्लच सोडायचा व अ‍ॅक्सिलेटर दाबायला जमत नव्हते; परंतु थोडय़ा प्रयत्नाने कार हळूहळू पुढे जायला लागली. अ‍ॅक्सिलेटर, ब्रेक, क्लच, गीअर जमायला लागले, पण ट्रेिनग चालू असताना शेजारी टीचर बसलेले असल्यामुळे कार नियंत्रित होत असे. त्याचे कारण मला नंतर कळले. टीचरच्या पायाजवळही ब्रेक व क्लच असतो. असो. कार स्वत: चालवल्यामुळे आत्मविश्वास वाढला.
डोंबिवलीसारख्या शहरात गर्दीच्या ठिकाणी कार चालवण्याचा सराव केला. ‘डोंबिवलीमध्ये जर तुला कार चालवता येते, तर जगातील कुठल्याही शहरात तू कार चालवू शकतोस,’ असे प्रमाणपत्र माझ्या मित्रमंडळींनी मला दिले. त्याचा अनुभव मला नंतर आला. मी मुलाकडे सिएटल, अमेरिका येथे गेलो असताना त्यांनी घेतलेली मर्सडिीस कार चालवून पाहिली. अर्थातच आतल्या रस्त्यावरून कार चालवली.
आता डोंबिवलीहून कळवा, कल्याण इत्यादी जवळपासच्या शहरांत नातेवाईकांकडे कारने जाण्याएवढी प्रगती झाली आहे. आता निवृत्त झाल्यावर मित्रांबरोबर शहराच्या आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असतो.
– प्रभाकर कोशे ,डोंबिवली

ड्रायिव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हिंग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. मेल करा. ls.driveit@gmail.com

Story img Loader