मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत. त्यांपकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहेत.
३३) प्रत्येक वाहनचालकाला मोटार वाहन कायदा १९८८ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे. कलम ११२, ११३, १२१, १२२, १२५, १३२, १३४, १८५, १८६, १९४, २०७.
सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत.
६) कलम १३२ काही विशिष्ट प्रकरणांमध्ये वाहनचालकाचे वाहन थांबवण्याचे कर्तव्य :
१) मोटार वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन
खाली वर्णन केलेल्या परिस्थितीमध्ये थांबवावे आणि सयुक्तिक कालावधीसाठी थांबवून ठेवावे; परंतु हा कालावधी २४ तासांपेक्षा जास्त नसावा —
अ) जेव्हा वाहनाचा अपघात होतो आणि या अपघातामध्ये मनुष्य, प्राणी, इतर वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले असते तेव्हा पूर्ण गणवेश घातलेल्या तसेच उपनिरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने थांबवल्यावर किंवा
ब) जेव्हा एखाद्या प्राण्यांच्या कळपाला किंवा एका प्राण्याला हाकणाऱ्या व्यक्तीने जर त्याला असे वाटत असेल की, वाहनामुळे सदर प्राणी उधळून नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात अशा वेळेस वाहन सयुक्तिक वेळेसाठी थांबवावे. तसेच प्राण्यांचा ताबा असलेल्या व्यक्तीने, वाहनाचा ताबा असलेल्या व्यक्तीने स्वतचे नाव आणि पत्ता अशा प्रकारच्या अपघातामुळे बाधित झालेल्या व्यक्तीने मागणी केल्यावर द्यावा; परंतु अशा परिस्थितीत बाधित व्यक्तीनेदेखील स्वत:चे नाव आणि पत्ता देणे बंधनकारक आहे. (कलम १३२ अपूर्ण)
सी एन जी किंवा एल पी जी इंधनावर चालणाऱ्या वाहनाच्या गॅस टाकीचा वापर करण्याची मुदत त्या टाकीवर अंकित केलेली असते. सदर मुदतीच्या आत या टाकीची हायड्रो टेस्ट करून प्रमाणपत्र घ्यावे आणि ते प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करून आर सी पुस्तक तसेच नोंदणी अभिलेख यामध्ये नोंद करून घ्यावी यासाठी बी टी / बी टी आय प्रकरणाप्रमाणे कारवाई करावी.
मोटार वाहन कायद्यातील सुधारणांबाबत माहिती morth.nic.in या केंद्र सरकारच्या वेब साइटवर उपलब्ध असते.
क्रमश:
संजय डोळे,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे</p>