वाहनांच्या इंधनात बचत करण्यासाठी इंजेक्टरचा शोध लागला. त्यात काळानुरूप बदल होत गेले. गाडीच्या इंजिनाबरोबरच हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. याविषयी थोडेसे..
आपली कर कशावर चालते असा प्रश्न जर कुणाला विचारला तर पटकन उत्तर येते ते पेट्रोल किंवा डिझेलवर. पण यामध्ये आणखी एक महत्वाचा दुवा आहे तो म्हणजे इंजेक्टर. आपल्या इंधनाची सर्व देखभाल करणे आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम हे इंजेक्टर करत असतात. नुकतेच एका भारतीय तरुणाने एक इंजेक्टर शोधून काढला आहे. ज्याचा वापर आपण जर ते इंजेक्टर आपण आपल्या गाडीत बसवून घेतले तर आपण २० टक्के इंधनाची बचत करू शकतो. यामुळे पुन्हा एकदा इंजेक्टर हा गाडीमधील तांत्रिक भाग चच्रेत आला आहे.
गाडीमध्ये आपण इंधन भरले की त्याचे नियंत्रण करण्याची मुख्य जबाबदारी हे इंजेक्टर पार पाडत असतात. इंजेक्टर नसते तर आपल्याला इंधनावर नियंत्रण ठेवता आले नसते. इंधनाचा वापर खूप जात प्रमाणात झाला असता. इंजेक्टरमुळे इंधनाला एका विशिष्ट प्रक्रियेतून इंजिनपर्यंत पाठविले जाते. या प्रक्रियेचा शोध साधारणत १९२०च्या सुमारास लागला. हर्बर्ट आक्रोयड स्टुअर्ट यांनी सर्व प्रथम एक जर्क पंप बनवला जो सध्याच्या गाडय़ांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंजेक्टर सारखाच होता. त्यांची ही पद्धत सर्वप्रथम हॉट बल्ब इंजिनमध्ये वापरण्यात आली. यानंतर ही प्रक्रिया बॉश आणि सेल्सील क्युमिन्स या कंपन्यांनी डिझेल इंजिनसाठी विकत घेतली. याचा पहिला व्यावसायिक वापर १९२०च्या उत्तरार्धात झाला. यापूर्वी १९०२ मध्ये याचा वापर फ्रान्सच्या विमानांमध्ये झाला होता. त्यावेळी लिओन लीवावास्सेर यांनी त्याचा शोध लावला होता. यानंतर याचा सर्वाधिक विकास हा दुसऱ्याा महायुद्धाच्या वेळेस झाला. त्यावेळेस बॉश, मित्सुबुशी अशा कंपन्यांना यामध्ये संशोधन आणि विकास करण्यास सुरुवात केली. १९४०मध्ये अल्फा रोमेओ याने पहिले इलेक्ट्रॉनिक इंजेक्टर शोधून काढले. यामध्ये कमी हाय प्रेशर सक्र्युलेटिंग फ्युएल पंपाचा वापर करण्यात आला. याच आधारे पुढील संशोधने सुरू झाली आणि आता निर्मल मुळे यांनी हाय प्रेशर इंजेक्टर शोधून इंधनाची बचत करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.
इंजेक्टरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. यामध्ये सिंगल पॉइंट इंजेक्टर, कंटिन्युअस पॉइंट इंजेक्टर, मल्टीपोर्ट फ्युएल इंजेक्टर असे प्रकार येतात. सिंगल पॉइंट इंजेक्टर हे सर्वात प्रथम विमानाच्या इंजिनमध्ये वापरण्यात आले होते. त्याचे छोटे रुपांतर १९८०मध्ये जनरल मोटर्स या कंपनीने बाजारात आणले. त्याला थ्रॉटल बॉडी इंजेक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. हे इंजेक्टर एकदम स्वस्त आणि मस्त असे आहे. याचा वापर अमेरिकी बनावटीच्या वाहतुकीच्या गाडय़ा आणि कमी वजनाचे ट्रक यामध्ये वापरण्यात आले होते.
कंटिन्युअस पॉइंट इंजेक्टर
यानंतर कंटिन्युअस पॉइंट इंजेक्टरचा शोध लागला. याचं वापर सर्वाधिक झाला आणि आजही अनेक कंपन्या याचा वापर करत आहेत. यामध्ये इंधन हे टप्याटप्याने इंजिनाकडे जात असले तरी त्याचा प्रवाह मात्र खंडीत होत नाही. हा प्रवाह जर खंडीत झाला तर इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. १९९०च्या दशकामध्ये बीएमडब्ल्यू, फेरारी, मर्सिडीझ बेन्झ, फोक्सव्ॉगन, फोर्ड, पोर्शे, ऑडी, व्होल्वो अशा कंपन्यांनी आपल्या गाडय़ांमध्ये ही यंत्रणा लावली. या पद्धतीमध्ये कंट्रोल युनिटमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या यंत्रणेच्या मदतीने इंधनाचा प्रवाह सोडला जातो. यामध्ये पाइपची विशिष्ट रचना करण्यात आली आहे. ज्यामुळे इंधन विविध प्रकारे फिरून इंजिनापर्यंत पोहोचते. यामुळे इंधनाचा आवश्यक तेवढाच वापर होतो.
मल्टीपोर्ट पॉइंट इंजेक्टरमध्ये इंधनावर दबाव निर्माण करण्यासाठी इतर प्रक्रीयांप्रमाणे सििलडरचा वापर न करता थेट इंधनाचाच वापर करण्यात आला आहे. याचा वापर रेल्वे इंजिनमध्ये करण्यात येतो. पण याचा वापर करण्यासाठी येणारा खर्च हा खूप जास्त असतो. याशिवाय विविध प्रकारच्या इंजेक्टरचा शोध काळानुरूप लगात गेला यात डायरेक्ट इंजेक्टर, स्व्रील इंजेक्टर, यातील सर्व प्रकारचे इंजेक्टर आजही वापरात आहेत. मात्र ते वेगवेगळ्या वाहनांमध्ये वापरले जाते. यातील डायरेक्ट आणि स्व्रील इंजेक्टर सर्वाधिक वापरले जात आहे. या दोन्ही इंजेक्टरमध्ये दबाव निमार्ण करण्यासाठी सििलडर एवजी इंधानाचाच वापर केला जातो. तो खूप फायदेशीर असतो. इतकेच नव्हे तर त्यामुळे इंजिनचा दुरुस्ती खर्चही कमी होत जातो. सध्या यामध्ये आणखी संशोधन होत असून भविष्यात आपल्याला एक प्रमाणित इंजेक्टर मिळेल अशी आशा आहे.
इंधनाची बचत करणारा इंजेक्टर
वाहनांच्या इंधनात बचत करण्यासाठी इंजेक्टरचा शोध लागला. त्यात काळानुरूप बदल होत गेले.
आणखी वाचा
First published on: 07-11-2013 at 07:39 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel saver injector