dr09बाइक किंवा टू-व्हीलर हा मध्यमवर्गीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. आजच्या काळात स्वत:च्या मालकीची दुचाकी असणे अगदी आवश्यक झाले आहे. मात्र सात दशकांपूर्वीची गोष्ट वेगळी होती. फटफटी असणे म्हणजे त्या काळी स्टेटस सिम्बॉल असायचा. भारतात दुचाकीनिर्मितीला तेव्हा सुरुवातही झाली नव्हती. त्या काळी थेट परदेशातूनच दुचाकी आयात कराव्या लागायच्या आणि त्यामुळेच दुचाकी बाळगणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण असायचे. भारतात दुचाकीचे युग खऱ्या अर्थाने उगवले १९५५ मध्ये. रॉयल एन्फिल्ड ही ३५० सीसीची बाइक त्या वेळी प्रथमच भारतात दाखल झाली. फोर स्ट्रोक इंजिन असलेली आणि इंधनस्नेही असलेल्या एन्फिल्डने तर देशभरात तुफान लोकप्रियता मिळवली. ३५० सीसीच्या या बाइकचे उत्पादन ब्रिटिश कंपनीचे. रॉयल एन्फिल्ड असेच या कंपनीचे नाव होते, आणि बाइकनिर्मितीत तिची जगभरात मक्तेदारी होती. मात्र या मक्तेदारीला आव्हान दिले इटलीने. १९७५ मध्ये इटालियन कंपनीने तयार केलेली स्कूटर भारतात आली आणि एन्फिल्ड काहीशी मागे पडली. गावागावात स्कूटर दिसू लागली. पुढे तर इटालियन कंपनीने सरकारकडेच भारतातील कारखाना विकून टाकला आणि सरकारने स्कूटर्स इंडिया लिमिटेड ही नवी कंपनी सुरू केली..
मयुर भंडारी

केअर टेकर
dr07चारचाकी ही आता दुचाकीइतकीच गरजेची वस्तू झाली आहे. सर्वसाधारणपणे असे आढळून आले आहे की, गाडी घेतल्यानंतर तिची फारशी देखभाल केली जात नाही. विशिष्ट कालावधीनंतर गाडीकडे दुर्लक्ष होऊ लागते. मग अचानक एक दिवस रस्त्यात गाडी बंद पडली की साक्षात्कार होतो. असे होऊ नये यासाठी गाडीची काय काळजी घ्यावी, कशी घ्यावी वगरे सांगणारे हे सदर.. या सदरात गाडय़ांविषयी इतरही बाबींची चर्चा होईल.
सर्वसाधारणपणे आपण शहर आणि शहराबाहेर (हायवे) गाडी चालवतो. दोन्ही वेळेस आपण वेगवेगळी काळजी घेतली पाहिजे. गाडी हे एक यंत्र आहे आणि त्याचे अनेक वेगवेगळे भाग एकत्रितपणे चालून गाडी चालते. यातील एकसुद्धा भाग बिघडला तरी गाडी बंद पडू शकते. जर आपण नियमितपणे सíव्हसिंग केली पाहिजे.
गाडीचा आवाज हा गाडी आणि चालक यांच्यातला संवादक असतो. गाडी चालू होताना, गीअर बदलताना, अचानक थांबवल्यास थोडासुद्धा वेगळा आवाज करीत असेल तर तो पुढे येणाऱ्या मोठय़ा बिघाडाची सुरुवात असते. लगेच गाडी योग्य ठिकाणी तपासून घ्या.
गाडीच्या चारही चाकांची हवा दर आठवडय़ाला चेक केली पाहिजे. त्यामुळे इंधन वाचते आणि पंक्चर होण्याचे प्रमाण कमी होते. नायट्रोजन गॅस भरल्यामुळेही फायदा होतो पण अनेकदा नायट्रोजन भरल्यावर हवा दर आठवडय़ाला तपासली जात नाही आणि योग्य फायदा होत नाही. ही काळजी घेतल्यास टायर जास्त टिकतो. गाडीचे मागील आणि पुढील दिवे, इंडिकेटर्स यांची नेहमी तपासणी केली पाहिजे. थंडीच्या दिवसात गाडी सुरू केल्यावर १० ते २० सेकंद सुरू ठेवून मग पहिला गीअर टाका. त्यामुळे इंजिनाच्या प्रत्येक भागात इंजिन ऑईल पोहोचते. त्यामुळे गाडीचे तापमान योग्य राहून बिघाडाची शक्यता कमी होते. गाडीच्या पुढील भागात इंजिनाभोवती कधी धूळ साठू देऊ नका. महिन्यातून एकदा ते साफ होईल याची काळजी घ्या. नीट साफ न झाल्यास गाडीचे तापमान योग्य राहत नाही. गाडी जास्त तापते (नाही तर ते फक्त सíव्हसिंगला उघडले जाते). गाडी नेहमी बाहेरून धुतली जाईल हे बघा.
-अमोल चरेगांवकर

Story img Loader