मयुर भंडारी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मयुर भंडारी
केअर टेकर
सर्वसाधारणपणे आपण शहर आणि शहराबाहेर (हायवे) गाडी चालवतो. दोन्ही वेळेस आपण वेगवेगळी काळजी घेतली पाहिजे. गाडी हे एक यंत्र आहे आणि त्याचे अनेक वेगवेगळे भाग एकत्रितपणे चालून गाडी चालते. यातील एकसुद्धा भाग बिघडला तरी गाडी बंद पडू शकते. जर आपण नियमितपणे सíव्हसिंग केली पाहिजे.
गाडीचा आवाज हा गाडी आणि चालक यांच्यातला संवादक असतो. गाडी चालू होताना, गीअर बदलताना, अचानक थांबवल्यास थोडासुद्धा वेगळा आवाज करीत असेल तर तो पुढे येणाऱ्या मोठय़ा बिघाडाची सुरुवात असते. लगेच गाडी योग्य ठिकाणी तपासून घ्या.
गाडीच्या चारही चाकांची हवा दर आठवडय़ाला चेक केली पाहिजे. त्यामुळे इंधन वाचते आणि पंक्चर होण्याचे प्रमाण कमी होते. नायट्रोजन गॅस भरल्यामुळेही फायदा होतो पण अनेकदा नायट्रोजन भरल्यावर हवा दर आठवडय़ाला तपासली जात नाही आणि योग्य फायदा होत नाही. ही काळजी घेतल्यास टायर जास्त टिकतो. गाडीचे मागील आणि पुढील दिवे, इंडिकेटर्स यांची नेहमी तपासणी केली पाहिजे. थंडीच्या दिवसात गाडी सुरू केल्यावर १० ते २० सेकंद सुरू ठेवून मग पहिला गीअर टाका. त्यामुळे इंजिनाच्या प्रत्येक भागात इंजिन ऑईल पोहोचते. त्यामुळे गाडीचे तापमान योग्य राहून बिघाडाची शक्यता कमी होते. गाडीच्या पुढील भागात इंजिनाभोवती कधी धूळ साठू देऊ नका. महिन्यातून एकदा ते साफ होईल याची काळजी घ्या. नीट साफ न झाल्यास गाडीचे तापमान योग्य राहत नाही. गाडी जास्त तापते (नाही तर ते फक्त सíव्हसिंगला उघडले जाते). गाडी नेहमी बाहेरून धुतली जाईल हे बघा.
-अमोल चरेगांवकर