एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांच्या ज्ञान, भांडवल, साधन संपत्तीचा वापर करून यशाचे नवे शिखर गाठता येते व विशिष्ठ कालावधीत अचाट प्रगती करता येते आणि स्वतचे नवे विश्व उभारता येते याचा प्रत्यय येतो हिरोहोंडा (सध्याची हिरो मोटोकॉर्प) कंपनीच्या पाउलखुणा चाळताना. जपानमधील होंडा मोटरसायकल जपान कंपनी लिमिटेड यांचे तंत्रज्ञान आणि भारतातील हिरो सायकल्स या कंपनीचे व्यवस्थापन आणि मनुष्यबळ यांच्या एकत्रीकरणाने १९८४ मध्ये स्थापन झालेली हिरोहोंडा कंपनी म्हणजे भारतातील दुचाकींच्या जगातील एक विश्वासाचे नाव आहे. हिरोहोंडा म्हणजे भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी. फोर्ब्सच्या जगातील सर्वात आदरणीय कंपन्यांच्या यादीत हिरोहोंडाने १०८वा क्रमांक मिळवला होता. या कंपनीची ही कामगिरी म्हणजे तिने जगभरातील ग्राहकांच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. २०१० साली भारतीय भागीदार हिरो सायकल्स आणि जपानी भागीदार होंडा मोटरसायकल्स जपान कंपनी लिमिटेड यांची ही २६ वर्षांची भागीदारी संपुष्टात आली आणि हिरो सायकल्स ने ‘हिरो मोटोकॉर्प’या नव्या नावाने सुरुवात केली आहे. हिरोहोंडा ची २६ वर्षांची कारकीर्द आणि हिरो मोटोकॉर्पने गेल्या दोन वर्षांत आखलेली नवी धोरणे आणि त्यांनी बाजारात दाखल केलेली नवीन उत्पादने हा सर्वच प्रवास अनोखा आहे.
देश की धडकन..
एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांच्या ज्ञान, भांडवल, साधन संपत्तीचा वापर करून यशाचे नवे शिखर गाठता येते व विशिष्ठ कालावधीत अचाट प्रगती करता येते आणि स्वतचे नवे विश्व उभारता येते याचा प्रत्यय येतो हिरोहोंडा (सध्याची हिरो मोटोकॉर्प) कंपनीच्या पाउलखुणा चाळताना.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-02-2013 at 01:01 IST
TOPICSराष्ट्र
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heartbeats of nation