ही सर्व लक्षणे बघून होंडाने आपली सर्व क्षमता हिरोहोंडा ऐवजी स्वतंत्र होंडा निर्मितीच्या गाडय़ा विकण्यासाठी वापरायचे ठरवून हिरो ग्रुपपासून फारकत घेतली, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिरो आणि होंडा यांची युती तुटल्यावर ज्या पद्धतीने होंडा बाजारपेठेत आपली पावले टाकत आहे त्यावरून तज्ञांचे हे मत अचूक असल्याचे जाणवते. कदाचित हिरोहोंडाने जो प्रवास काही दशकात केला तो प्रवास होंडाने भारतीय बाजारपेठेत काही वर्षांत केलेला दिसून येतो. हिरोहोंडा ने प्रथम सामान्य दुचाकी मोटारसायकल, मग गिअरलेस गाडय़ा आणि नंतर सुपर बाइक्स अर्थात अति वेगवान गाडय़ा या पद्धतीने कित्येक वर्षांत भारतीय बाजारपेठेत नवीन वाहने उतरविली. पण होंडाने मात्र युती तुटल्यावर काही वर्षांच्या आतच १००cc पासून ते ५००cc पर्यंतच्या बाइक्स भारतीय बाजारात उतरवल्या आहेत. थोडक्यात, कोणत्याही ग्राहकवर्गाकडे दुर्लक्ष न करता सर्व ग्राहकवर्गाला आपल्याकडे ओढण्याचा होंडाचा प्रयत्न जोमाने सुरू आहे.
सुपरबाइक्स
भारतात अलीकडच्या काही वर्षांपासूनच सुपरबाइक्स नजरेस पडू लागल्या आहेत. मात्र, असे असले तरी सुपरबाइक्सची फार मोठी बाजारपेठ भारताबाहेर अस्तित्वात आहे. दर्जेदार सुपरबाइक्सची निर्मिती करण्यात जगभर होंडाचा बोलबाला आहे. जेव्हा भारतातही या अतिवेगवान गाडय़ांच्या विक्रीला पोषक असे वातावरण निर्माण झाले, तेव्हा होंडाने भारतात त्यांच्या सुपरबाइक्सची विक्री करण्यास सुरुवात केली आणि आज अतिवेगवान दुचाकींच्या भारतीय बाजारपेठेत असलेले होंडाचे वर्चस्व आपल्याला अगदी सहजपणे दिसून येईल. होंडाने त्यांच्या वेगवान गाडय़ांच्या सर्व श्रेणींमधील अतिशय प्रसिद्ध असलेली CBR श्रेणी बाजारांत उतरवून पहिली आणि जेव्हा तिला योग्य प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात आले, तेव्हा भारतीय बाजारातील त्यांच्या विविध मॉडेल्सची संख्या वाढवण्यास त्यांनी सुरुवात केली. यंदा होंडा CBR ५००R बाजारात उतरवणार आहे. या गाडीची ही तोंडओळख..
CBR vqqR
एक अतिशय दर्जेदार उत्पादन म्हणून ओळखल्या जाणारी CBR श्रेणी भारतीय बाजारपेठेत चांगलीच उचल घेत आहे. यंदा भारतीय रस्त्यांवर दाखल होणाऱ्या होंडा CBR ५००R मध्ये वापरलेल्या उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा लेखाजोखा-
इंजिन
होंडा CBR ५००R मध्ये दोन सििलडर ट्विन इंजिन वापरले आहे. कुठल्याही इंजिनाची क्षमता जेवढी महत्वाची असते तेवढीच त्याची स्थिरता देखील. होंडाचे हे इंजिन अतिशय स्थिर आणि उर्जावन म्हणून प्रसिद्ध आहे.
हेड लाइट्स
गाडीचे लाइट्स हे केवळ साधे प्रकाशाचे स्रोत नसतात तर त्यातही अतिशय कुशल तंत्राचा वापर केला असतो. गाडीच्या प्रकाशाची वेव्हलेन्थ, प्रकाशाची गुणवत्ता, त्याचा रस्त्यांवर होणारा विस्तार आणि त्याचा बॅटरीवर पडणारा ताण या सर्व बाबींचा विचार करता लाइटच्या आत वापरलेले तंत्रज्ञान, रिफ्लेक्टरची अत्यंत किचकट अशी रचना यांना भरपूर वेळ द्यावा लागतो. होंडा CBR ५००R चे हेडलाइट्स हे ५५ Wa३३ क्षमतेचे असून त्यात हॅलोजन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. लाइट्सच्या रिफ्लेक्टरच्या अभ्यासपूर्ण रचनेमुळे चालकाला हा प्रकाश अत्यंत चांगल्या पद्धतीने रस्त्यांवर पसरलेला दिसतो. कित्येक वेळा अतिशय चांगल्या गाडय़ाही लाइट्ससारख्या किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे वापरण्यास तितक्या सोयीच्या ठरत नाही. होंडाने लाइट्सवर लक्ष केंद्रित करून किरकोळ बाबींकडेही तितकेच लक्ष असल्याची खात्री ग्राहकांना दिली आहे.
ब्रेक्स
सुरक्षेचे नियम हल्ली अधिकाधिक कठोर होत आहेत त्यामुळे कुठल्याही वाहनाचे ब्रेक्स हे काटेकोरपणे तयार केलेले असतात. सुपरबाइक्स तर अतिवेगवान असल्याने त्यांचे ब्रेक्स चांगले असणे फार गरजेचे आहे. होंडा CBR ५००R मध्ये ABS तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ABS म्हणजे Anti Lock Breaking System. निसरडय़ा रस्त्यांवर आणि अत्यंत वेगात असताना वाहन थांबवणे कित्येक वेळा कुशल बाइकर देखील शक्य होत नाही. त्यामुळेच, पावसाळ्यात, ओल्या रस्त्यांवर अत्यंत वेगात असताना होणारया अपघातांचे प्रमाण फार आहे. या बाबींचा विचार करून ABS तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली. ABS तंत्रज्ञान वापरणाऱ्या गाडय़ा सामान्य कुशलतेच्या चालकाकडूनही फारसे कष्ट न घेता ओल्या रस्त्यांवर देखील थांबविल्या जाऊ शकतात. वाहन अत्यंत वेगात असताना ब्रेक्स लावल्यास गाडी वळवणे शक्य नसते परंतु ABS प्रणालीमध्ये ब्रेक्स दाबले असताना देखील वाहन स्लीप न होऊ देता वळवता येते. ही प्रणाली शक्यतो चारचाकी वाहनांमध्ये वापरली जायची परंतु वेगवान दुचाकींमध्येही ही प्रणाली नव्याने वापरली जाते आहे आणि होंडा उइफ ५००फ मध्ये देखील या तंत्रज्ञाचा वापर करण्यात आला आहे.
फ्रेम
गाडीची फ्रेम म्हणजे तिचा मुलभूत सांगाडा. हा सांगाडा कोणत्या पद्धतीने व कुठल्या धातूपासून बनवला आहे यावर गाडी किती मजबूत आणि दणकट आहे हे ठरते. ऑफ रोड व वेगवान दुचाकींसाठी वापरण्यांत येणारे सांगाडे हे शहरात वापरल्या जाणाऱ्या गाडय़ांच्या तुलनेत अधिक दणकट असतात. होंडा CBR ५००R चा संपूर्ण सांगाडा हा स्टील टय़ूब्ज वापरून बनवण्यात आला आहे. या टय़ूब्जची मांडणी देखील गाडीला अधिक दणकट करण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
सीट्स
अतिवेगवान दुचाकींबाबत असणारी एक महत्वाची तक्रार म्हणजे त्यांची मागच्या बाजूची बठकही (सीट्स) फारच गरसोयीची असते. होंडा CBR ५००R मध्ये देखील अशाच प्रकारच्या बठक योजनेचा वापर करण्यात आला आहे परंतु मागील माणसाला धरून ठेवण्याकरिता अतिशय सोयीचे पडतील असे दोन रॉड मागच्या बाजूला देण्यात आले आहेत.
इतर बाबी
CBR ५००R मध्ये ग्राहकाच्या गरजांचा विचार करून अनेक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या गाडीत इंधन पातळी दर्शक, वेग दर्शक याबरोबरच इंजिनाची परिस्थिती दाखवणारी प्रणाली देखील आहे. सायलेन्सर, टायर्स व अन्य अनेक बारीकसारीक बाबींची निर्मिती कमीतकमी गरसोय व्हावी आणि उपयुक्तता वाढावी या पद्धतीने करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी ही दुचाकी आपल्याला रस्त्यांवर हमखास दिसू शकेल. उइफ ५००फची भारतीय बाजारपेठेत काय किंमत असेल यावर भरपूर तर्कवितर्क सुरू आहेत. किंमत काहीही असो, सुपरबाइक्सचे शौकीन या गाडीला निश्चितच आपली पसंती देतील.
होंडा है सदा के लिए..
हिरोहोंडा ही कंपनी आपली उत्पादने बाजारात उतरवीत असतानाच होंडाने देखील त्यांची दर्जेदार उत्पादने बाजारात उतरवण्यास सुरुवात केली. Activa, शाईन, युनिकॉर्न, स्टनर इत्यादी अनेक गाडय़ा होंडाने नियोजनबद्धरित्या भारतीय बाजारपेठेत दाखल केल्या आणि त्यांना बाजारातून वाढता प्रतिसाद मिळत गेला.
आणखी वाचा
First published on: 28-02-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda is for lifetime