प्रीमियम कारच्या उत्पादनातील आघाडीची कंपनी असलेल्या होंडा मोटर्सने आता भारतातील उत्पादनात वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने राजस्थानातील तापुकारा येथे तब्बल साडेचारशे एकर जमिनीवर कारखाना उभारण्यात आला आहे. या कारखान्यातून उत्पादनाला सुरुवात झाली असून दरवर्षी एक लाख २० हजार गाडय़ा येथून बाहेर पडतील. राजस्थानातील हा पहिलावहिला कारनिर्मिती कारखाना आहे, हे विशेष. या नव्या कारखान्यातून होंडा अमेझ ही गाडी प्रथम उत्पादित होऊन बाहेर पडेल. गेल्या वर्षी कारविक्रीत होंडाने देशात दुसरा क्रमांक पटकावला. तिचा बाजारहिस्साही वाढीस लागला आहे. हंगामी अर्थसंकल्पात कारच्या उत्पादनावरील अबकारी करात कपात करण्यात आल्याने कारची विक्री वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा