नेहमी वाहन चालविताना काही महत्वाची कागदपत्रे ही जवळ बाळगलीच पाहिजेत ती म्हणजे इन्शुरन्स सर्टिफिकेट, टॅक्स टोकन, वाहन चालवण्याचे लायसन्स. कोणत्याही वेळी वाहन चालवताना सदर कागदपत्रे ही आपल्या जवळ ठेवली पाहिजेत अशी कायद्याने सक्ती केलेली आहे. वाहतूक पोलिसांनी या कागदपत्रांची मागणी आपल्याकडे केली तर ती दाखवणे आपल्यावर बंधनकारक आहे. ती नसल्यास दंड ठोठावण्याची कायद्यात तरतूद आहे. यात इन्शुरन्सचे कागदपत्र असणे अथवा गाडीचा विमा उतरवलेला असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लोक सहसा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात पण त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
मोटर वाहन कायद्यात इन्शुरन्सचा समावेश हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वाहनाचा इन्शुरन्स हा सहसा दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारात ज्या वाहन चालकाने इन्शुरन्स काढला आहे त्याच्या गाडीचा नुकसान भरपाई संदर्भात इन्शुरन्स असतो. यात ज्या व्यक्तीने गाडीचा इन्शुरन्स काढलेला आहे त्याच्या गाडीच्या नुकसानी संदर्भात भरपाईची हमी संबंधित इन्शुरन्स कंपनीकडून दिली जाते. तर दुसरा प्रकार हा थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणून ओळखला जातो. यात या वाहनामुळे होणारे दुसऱ्यांचे नुकसान या गोष्टींचा समावेश असतो. अपघातग्रस्त वाहनामुळे एखाद्या व्यक्तीला इजा अथवा तिच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर अथवा दुसऱ्या वाहनाचे काही नुकसान झाले तर नुकसानीची भरपाई करण्याची हमी इन्शुरन्स कंपनीने दिलेली असते, म्हणून थर्ड पार्टी इन्शुरन्सचे महत्व फार आहे. या प्रकारात इन्शुरन्स कंपनी ही तिसऱ्या व्यक्तीबरोबर कोणत्याही स्वरूपाचा करार नसतानादेखील तिच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानभरपाईची हमी देते. या गोष्टीमुळे अपघातग्रस्त वाहनचालकाची अथवा मालकाची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी ही इन्शुरन्स कंपनी घेते त्यामुळे साहजिकच याचा फायदा केवळ वाहन चालक अथवा मालकाला होत नसून अपघातग्रस्तांना देखील होत आहे.
म्हणूनच जास्तीत जास्त प्रमाणात थर्ड पार्टी इन्शुरन्सची हमी देणारा इन्शुरन्स हा अत्यावश्यक मनाला जातो. या गोष्टीवरून वाहनाला इन्शुरन्स बंधनकारक करणे हे जाचक नसून हे केवळ जनतेच्या हितासाठीच केले गेले आहे हे अधोरेखित होते. इन्शुरन्सचा समावेश होण्याआधीची परिस्थिती मात्र बिकट होती. नुकसानभरपाई मिळवणे अथवा देणे हे अत्यंत अवघड व क्लिष्ट स्वरूपाचे होते. तसेच या प्रकरणांत उशीर होत होता. या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठीच कायद्यात बदल केला गेला व प्रत्येक मोटार वाहनाला इन्शुरन्स काढणे हे अत्यावश्यक व बंधनकारक केले गेले. तसेच या बदलामुळे अपघातग्रस्त हे नुकसानभरपाई मागताना मोटार वाहन चालक अथवा मालक यांबरोबरच इन्शुरन्स कंपनीलादेखील न्यायालयात आवश्यक पक्षकार म्हणून सामील करू शकतात व त्यांचे कडून त्वरित नुकसानभरपाई मिळणेस मदत होते. पुढील भागात वाहनाचा इन्शुरन्स संबंधातील महत्वाच्या कायदेशीर तरतुदींची कलमवार चर्चा करू या.
jayramsuryawanshi @gmail.com
गाडीला विमाकवच हवेच
नेहमी वाहन चालविताना काही महत्वाची कागदपत्रे ही जवळ बाळगलीच पाहिजेत ती म्हणजे इन्शुरन्स सर्टिफिकेट, टॅक्स टोकन, वाहन चालवण्याचे लायसन्स. कोणत्याही वेळी वाहन चालवताना सदर कागदपत्रे ही आपल्या जवळ ठेवली पाहिजेत अशी कायद्याने सक्ती केलेली आहे.
आणखी वाचा
First published on: 06-03-2014 at 06:56 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insurance cover needed for vehicle