‘सेकंडहँड का होईना, पण दाराबाहेर गाडी हवी’, या मानसिकतेतून भारतीय ऑटोमोबाइल सेक्टर कधीच पुढे आलं असून आता गाडी नवीनच हवी, असा अट्टहास पाहायला मिळतो. त्याहीपुढे जाऊन नव्या गाडीत काय काय सोयी हव्यात, हेदेखील अगदी कटाक्षाने बघितलं जातं. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाची सोय म्हणजे एलईडी लाइट्स! आपल्या अनोख्या आणि छोटय़ा आकाराने गाडीला एक वेगळाच लुक देणारे हे एलईडी लाइट्स केवळ त्या लुक्ससाठीच नाही, तर इतरही अनेक गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गाडी चालवताना एलईडी लाइट्सचे काय फायदे होतात, चला पाहू या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही वर्षांत भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने प्रचंड कात टाकली आहे. फियाट, मारुती आणि अ‍ॅम्बेसेडर या तीनच गाडय़ांची मक्तेदारी असलेल्या भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेत आता अनेक युरोपीय-कोरियन-जपानी कंपन्यांनीही आपले बस्तान बसवले आहे. या कंपन्यांच्या आकर्षक गाडय़ांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. या कंपन्यांचं ऑटोमोबाइल तंत्रज्ञान तर भुरळ पाडणारं आहेच, पण त्याहीपेक्षा या गाडय़ांचा लुक, त्यांची फिचर्स यांची क्रेझ सध्या भारतीय बाजारपेठेत जास्त आहे.
याच गाडय़ांमधील महत्त्वाचा पण आतापर्यंत दुर्लक्षिला गेलेला घटक म्हणजे एलईडी लाइट्स! गाडी चालवणाऱ्या कोणालाही लाइटची गरज किती आणि काय असते, हे वेगळं सांगायला नको. त्यातही हे एलईडी लाइट्स गाडीच्या लुक्समध्ये भर टाकणारे आहेतच. त्याशिवाय त्यांच्या अनोख्या तंत्रज्ञानामुळे फायदेशीरही आहेत

फायदा काय?
एलईडी लाइट्स बसवल्याने गाडीला एक मॉडर्न लुक मिळतो, हा एक महत्त्वाचा फायदा आहे. पण केवळ रूपावर न भाळता इतरही गुणांचा विचार केला, तरी एलईडी लाइट्स खूपच उपयोगी असल्याचं दिसतं. त्यामुळेच अनेक कंपन्या आता आपल्या गाडय़ांच्या टेललाइटमध्ये तरी या प्रणालीचा वापर करत आहेत. सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातील गाडय़ांच्या टेललाइट्समध्येच ही प्रणाली वापरली जात असल्याने टेललाइट्सच्या बाबतीत तरी काय आहेत या एलईडी लाइटचे फायदे तेसुद्धा पाहू या.
अधिक प्रखर दिवे
गाडीच्या मागच्या भागात म्हणजेच टेललाइट्स एलईडी प्रणालीचे असतील, तर ते तुमच्या सुरक्षेसाठी कधीही चांगलंच आहे. आता थंडीचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये सकाळी किंवा रात्रीही धुकं पडतं. विशेषत: शहराबाहेरचा, शेतांच्या किंवा जंगलाच्या बाजूचा, नदीच्या बाजूचा किंवा डोंगरातला रस्ता असेल, तर धुकं अधिकच दाट असतं. अशा वेळी गाडीचे टेललाइट्स एलईडी असतील, तर त्यामुळे मागून येणाऱ्या गाडय़ांना खूप लांबूनही तुमची गाडी दिसू शकते. परिणामी अपघात टळतात.

टिकाऊपणा
भारतात एखादी गोष्ट घेताना ती किती दिवस वापरता येईल, हा एक निकष लावला जातो. एलईडी टेललाइट्स या निकषावर पूर्णपणे उतरतात. साधारण दिव्यांमध्ये नाजूक तार असते. ही तार वापरून वापरून जळते. मात्र एलईडी दिव्यांमध्ये अशी कोणतीही तार नसते. त्यामुळे गाडीसाठी वापरण्यात येणाऱ्या साध्या दिव्यांच्या तुलनेत एलईडी दिव्यांचे आयुर्मान दहापट जास्त असते. त्यामुळे हे दिवे खर्चीक असले, तरीही दीर्घकाळ टिकणारे असल्याने उत्तम पर्याय म्हणून बघितले जातात.

वॉटरप्रूफ
बऱ्याचदा टेललाइट किंवा हेडलाइट यांच्या बॉक्समध्ये पाणी गेल्याचं आढळतं. गाडी गॅरेजमध्ये उभी नसेल किंवा आडोशाला नसेल, तर पावसाळ्याच्या दिवसांत हा त्रास हमखास जाणवतो. त्यामुळे दिव्यांची दृश्यमानता कमी होते. मात्र एलईडी दिव्यांच्या बाबतीत हा त्रास अजिबातच जाणवत नाही. एलईडी टेललाइट्स हे पूर्णपणे वॉटरप्रूफ आहेत. हे दिवे बसवताना ते सॉलिड स्टेट टेक्नॉलॉजीच्या मदतीने बसवले जातात. त्यामुळे कितीही पाऊस पडला, तरी पाणी या दिव्यांच्या आतून झिरपत नाही. याचा आणखी एक फायदा म्हणजे हे दिवे धूळ आणि तेल यांच्यापासूनही सुरक्षित राहतात. या गोष्टींची काजळी दिव्यांवर चढत नाही. परिणामी पावसाळ्यातही हे दिवे व्यवस्थित काम करतात.

ऊर्जाबचतीत अव्वल
एलईडी दिवे इतर दिव्यांपेक्षा खूपच कमी विजेवर चालतात, हे कधीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे गाडय़ांमध्ये अशा दिव्यांचा वापर केल्यास ते किफायतशीर ठरते. साध्या दिव्यांपेक्षा एलईडी दिवे निम्म्याहून अधिक ऊर्जेवर चालतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गाडय़ांसाठी तर एलईडी दिवे हा उत्तम पर्याय आहे. तसेच इंधनावर चालणाऱ्या गाडय़ांमध्येही या दिव्यांच्या वापरामुळे बॅटरी दीर्घकाळ टिकते. तसेच पैशांचीही बचत होते.

खडबडीत रस्त्यांवरही धोका नाही
गाडी खडबडीत रस्त्यावरून गेली की, चालकाला पहिली भीती असते ती म्हणजे कुठेही वायर कनेक्शन लूज झालं नाही ना ही! अशा रस्त्यांवरून गाडी गेली की, हमखास हेडलाइट, टेललाइट, हॉर्न किंवा वायपर यांच्यापैकी काही तरी बंद पडतं, हा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र गाडीला एलईडी दिवे असतील, तर किमान हेडलाइट किंवा टेललाइट यांच्याबाबत निश्चिं राहा! हे दिवे बसवताना सॉलिड स्टेट टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने दिव्यांच्या अवतीभवती हलणारे भाग किंवा नाजूक वायर्स नसतात. परिणामी खड्डे, गतिरोधक वगैरेंचा सामना करूनही एलईडी दिवे तेवढाच प्रखर प्रकाश देतात.

फक्त आलिशान गाडय़ांसाठीच का?
सध्या एलईडी लाइट्सचा वापर मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू अशा गाडय़ांच्या हेडलाइट्स आणि टेललाइट्समध्ये सर्रास बघायला मिळतो. गाडय़ांमध्ये एलईडी लाइट्स ही प्रणाली बसवणे थोडेसे खर्चीक आहे. पण काही कंपन्यांनी छोटय़ा गाडय़ांच्या टेल लाइटमध्ये एलईडी लाइटचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यात महिंद्रा व्हेरिटो, निसान पल्स आणि नुकतीच बाजारात आलेली फियाटची पुंतो इव्हो या गाडय़ांचा समावेश आहे. त्याशिवाय टाटाची नवीन झेस्ट आणि ह्युंदाईची आय-२० या गाडय़ांमध्ये या कंपन्यांनी दिवसा वापरात येणारे एलईडी लाइट्स देऊ केले आहेत. एलईडी लाइट्सची किंमत साध्या लाइट्सपेक्षा जास्त असली, तरी दीर्घायुष्य, उत्तम परफॉर्मन्स यांच्या मदतीने हा फरक सहज भरून निघतो. काही काळानंतर हेच दिवे जास्तीत जास्त किफायतशीर ठरणार आहेत.

मूर्ती लहान, पण..
एलईडी दिव्यांचा आकार हा साध्या दिव्यांच्या तुलनेत खूपच कमी असतो. तसेच हे दिवे साध्या दिव्यांपेक्षा खूपच प्रखर असल्याने टेललाइटमध्ये बसवण्यासाठी खूपच कमी संख्येत लागतात. त्यामुळे टेललाइट बसवताना हे दिवे कमी जागा व्यापतात. तसेच या दिव्यांची रचना आकर्षक पद्धतीने करता येत असल्याने गाडीच्या लुक्समध्येही भर पडते.