मारूती सुझुकीतर्फे सुरू असलेल्या ‘यंग ड्रायव्हर, २०१३’ ही स्पर्धा नुकतीच संपली. स्मृतिरंजन दास हे या स्पध्रेचे मानकरी ठरले. गेल्या तीन महिन्यांपासून ही स्पर्धा सुरू होती. देशभरातील ४४ शहरांमध्ये जुलत ही स्पर्धा सुरू झाली. त्यातील सहभागासाठी तब्बल ५० हजार जणांनी नोंदणी केली होती. त्यातून अखेरीस २८ जणांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. सुरक्षित ड्रायिव्हग, वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन, वैध ड्रायिव्हग परवाना आणि १८ ते ३० यादरम्यान वय या प्रमुख अटी या स्पध्रेसाठी होत्या. स्पध्रेचा अखेरचा टप्पा गेल्याच आठवड्यात नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायिव्हग अँड ट्रॅफिक रिसर्च (आयडीटीआर) येथे पार पडला. त्यात अंतिम फेरीतील २८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्यातून स्मृतिरंजन दास यांची सर्वोत्तम यंग ड्रायव्हर म्हणून निवड करण्यात आली. सर्वात सुरक्षित ड्रायिव्हग करणारा यंग ड्रायव्हर म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ब्रँड न्यू अल्टो ८०० ही गाडीही दास यांना बक्षीस देण्यात आली. देशातील तरुणांमध्ये सुरक्षित ड्रायिव्हगबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मारूती सुझुकीतर्फे यंग ड्रायव्हर ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धकांच्या ड्रायिव्हग क्षमतेची सिम्युलेटर्सद्वारा चाचणी घेतली जाते. स्पध्रेच्या सर्व
अटी पूर्ण करत असेल तरच स्पर्धकाला स्पध्रेत सहभागी करून घेतले जाते. स्पध्रेच्या अंतिम फेरीत निवड करतानाही २० विविध चाचण्यांच्या दिव्यातून स्पर्धकांना जावे
लागले.
होंडाची प्रिमियम हॅचबॅक असलेली ब्रायो आता नव्या रुपात आली आहे. तिच्या अंतरंग आणि बाह्यरंगात बदल करण्यात आला असून फक्त सणासुदीसाठी ब्रायोचा हा नवा अवतार बाजारात आणण्यात आला आहे. विशेष म्हणजे ब्रायोने नुकताच दुसरा वाढदिवसही साजरा केला आहे. इंधनस्न्ोही, किफायतशीर व ड्रायिव्हगसाठी सोपी अशी जाहिरात केलेल्या ब्रायोला अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी तिच्या अंतरंगात थोडा बदल करण्यात आला आहे. गाडीच्या आतील बाजूत अधिक मोकळी जागा देण्याबरोबरच स्पोर्टी ब्लॅक कलर सर्व अंतरंगाला देण्यात आला आहे. तसेच बाह्यरंगातही थोडे बदल करण्यात आले आहेत. डोअर व्हायजर, एक्झॉस्ट पाइप फिनिशर, बॅक-अप सेन्सर आणि इल्युमिनेटेड साइड स्टेप गाíनश या अतिरिक्त एॅक्सेसरीजमुळेही ब्रायोला गेट-अप आला आहे. आता ब्रायो टॅफेटा व्हाइट, एॅलाबास्टर सिल्व्हर आणि रॅली रेड या रंगात उपलब्ध आहे. दिल्लीतील तिची एक्स शोरूम किंमत चार लाख ९२ हजार रुपये एवढी असेल.