मिनी ट्रकच्या श्रेणीमध्ये भारतीय बाजारपेठेत आता तशी बरीच वाहने दाखल झालेली दिसतात. यामध्येच आता महिन्द्र आणि महिन्द्रच्या एका वरच्या श्रेणीतील मिनी ट्रकची भर पडली आहे. सोमवारी ४ मार्च रोजी मुंबईमध्ये महिन्द्रच्या ‘मॅक्सिमो प्लस’ या मिनी ट्रकचे अवतरण करण्यात आले. मॅक्सिमोच्या या प्रकारच्या श्रेणीमधील हे सुधारित वाहन असून फ्युएल स्मार्ट टेक्नॉलॉजी या वेगळ्या पद्धतीने इंधन बचत करून देणारे ‘मॅक्सिमो प्लस’ हे व्यावसायिक मालवाहतुकीचे साधन कमाल २१.९ किलोमीटर प्रतिलिटर डिझेलला मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
९०९ सी. सी. क्षमतेचे दोन सिलेंडर असणारे व ८५० किलोग्रॅम मालाची वाहतूक करण्यासाठी तयार असणारे हे वाहन. कमाल २६ एचपी इतकी ताकद ‘मॅक्सिमो प्लस’ला देण्यात आली असून त्यात फ्युएल स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणून दिलेले एक नवे तंत्रज्ञान या नव्या ‘मॅक्सिमो प्लस’चे वैशिष्टय़ आहे. सामान भरलेला ‘मॅक्सिमो प्लस’ रस्त्यावरून विशेषकरून चढाच्या रस्त्यावरून धावताना त्याला २६ एच. पी. इतकी ताकद देता येते. त्यासाठी पॉवर व इकॉनॉमी असे पर्याय देण्यात आले असून एका पटनावर हे पर्याय वाहनचालक निवडू शकतो. त्यामुळे वाहनाच्या मालवाहतुकीचा ट्रे रिकामा असताना किंवा सपाट रस्त्यावर, वाहन वर्दळीतून ‘मॅक्सिमो प्लस’ धावताना त्यासाठी इकॉनॉमी हा पर्याय निवडता येतो. त्यामुळे प्रतिलिटर डिझेलला २१.९ किलोमीटर इतके मायलेज मिळू शकते. या इकॉनॉमी पर्यायामध्ये २६ एच. पी.ऐवजी १७ ते १८ एच. पी. इतकी ताकद ‘मॅक्सिमो प्लस’ ला प्रदान केली जाते. यामुळे त्याचे मायलेज वाढते. अनावश्यक ठिकाणी अधिक ताकदीवर वाहन चालविण्यापेक्षा ते शक्य तितक्या आवश्यक ताकदीवरही किफायतशीरपणे धावू शकेल, असा हेतू या मागे आहे.
सात पाटे मागच्या सस्पेन्शनला दिले असून सर्वसाधारणपणे या श्रेणीतील अन्य मिनी ट्रकना हे पाटे तीन असतात. यामुळे वाहन मालाने भरलेले असतानाही ताण येणार नाही. धक्के कमी बसतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा