मर्सिडिझचे सीडीआय हे मॉडेल भारतातील सर्वाधिक खपाचे म्हणून समजले जाते. याच सीडीआयचे नवीन सुधारित रूप म्हणून मर्सडिीझने नुकतेच ई ३५० सीडीआय हे मॉडेल लाँच केले आहे. या नव्या गाडीविषयी जाणून घेऊ या..
बाह्यरूप
नव्या ई ३५० सीडीआयच्या पुढील भागात करण्यात आलेले बदल हे पूर्वी सर्व ई-श्रेणीतील मॉडेलमध्ये केलेल्या बदलांशी सुसंगत आहेत. या ब्रॅण्डचे वेगळेपण उठून दाखविणाऱ्या सर्व आकारांना त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या ई ३५० सीडीआयचे बाह्यरूप आता अधिक देखणे झाले आहे. हेडलॅम्पच्या आतील भागातील दिव्यांच्या प्रवाही रचनेमुळे दर्शनी भागात ई-श्रेणीची ओळख ठरलेल्या ‘चार डोळे’ प्रकारचा ठसा कायम राखण्यात आला आहे.
ई-श्रेणीच्या मोटारींमध्ये पूर्वीच केलेल्या बदलांमध्ये या मोटारींच्या रेडिएटरच्या केंद्रस्थानी चांदणीची रचना करण्यात आली होती. नव्या ई ३५० सीडीआयमध्येही हीच संकल्पना कायम ठेवण्यात आली असून त्यामुळे मोटारीला स्वतंत्र आणि अधिक स्पोर्टी दृश्यस्वरूप लाभले आहे. आता मागच्या दरवाजाच्या खालच्या भागातून टेल लाइटपर्यंत एक फीचर रेषा खेचण्यात आली आहे. नवी ई ३५० सीडीआय आता अधिक गोलसर आणि देखणी वाटते, पण त्यामुळे तिच्या वेगवान आणि दणकट दिसण्यात काही बाधा आलेली नाही. पुनर्रचित ई-श्रेणीच्या मोटारींत एलईडी टेललाइटची रचना आडवी करण्यात आली असून ते दुरंगी दिवे मोटारीची रुंदी ठसवितात, तर फायबर ऑप्टिक दिव्यांमुळे रात्री वेगळे डिझाईन दिसते. नव्या ई ३५०सीडीआयचे मल्टीस्पोक १७ इंची लाइट अॅलॉय व्हील चमकदार असून मोटारीचा आलिशान दर्जा आणि स्पोर्टी स्वरूप अधोरेखित करतात.
इंटेलिजन्ट असिस्टन्स सिस्टम्स :नव्या ई ३५० सीडीआयमध्ये मोटार चालविण्याचा सर्वस्वी नवा, अधिक आनंददायक अनुभव देण्यात मर्सडिीझ-बेंझच्या इंटेलिजन्ट असिस्टंट सिस्टम्सचा वाटा मोठा आहे. तांत्रिक प्रगती आणि नव्या शोधांमुळे नवी ई ३५० सीडीआय चालविणे आता अधिक आनंददायक, सोयीचे झाले आहे. या नव्या यंत्रणेत इको स्टार्ट-स्टॉप सेवा कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात आली असून त्याच्या जोडीला इंटेलिजन्ट लायटिंग सिस्टम उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात प्रकाशझोत सर्वत्र सारखा पडण्याची सोय असून कॉर्निरग ही अतिरिक्त सुविधाही पुरविली आहे. हाय बीम असिस्ट यंत्रणेत ३६० अंशांत वळणारा कॅमेरा आहे. शिवाय टायरमधील दाब कमी होत असल्याचे सूचित करणारी यंत्रणा, कमांड ऑनलाइन सेवा आणि अटेन्शन असिस्ट या सेवाही आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा