स्वतच्या मालकीची कार असावी हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते. अनेकदा गाडी घेताना आपण तिच्या लूक्सचा, त्यात देण्यात आलेल्या आरामदायी सुविधांचा जास्त विचार करतो. पण खरंच आपण आपल्याला हव्या असलेल्या कारचे फीचर्स लक्षात घेतो का? फक्त लूक्स आणि आराम याव्यतिरिक्त इतर गोष्टीपण कार निवडताना महत्वाच्या ठरतात. या पाश्र्वभूमीवर कार घेताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे गरेजेचे आहे याचा उहापोह आपण करणार आहोत.
सगळ्यात अगोदर प्रश्न येतो तो बजेटचा. साडेचार ते पाच लाख रुपयात एक चांगली फॅमिली कारची रेंज सुरू होते. कार दिसायला चांगली असली तरी इतर बाबीही असतातच, जसे की इंजिनाची क्षमता. तुम्हाला फक्त शहरातच फिरण्यासाठी गाडीचा वापर करायचा असेल तर ८०० सीसी क्षमतेचे इंजिन असलेली गाडी तुमच्यासाठी पुरेशी ठरू शकेल. ती ज्या कंपनीची आहे त्या कंपनीचे सíव्हस स्टेशन्स जास्तीतजास्त ठिकाणी आहेत ना हे मात्र आधी तपासून घ्यावे. हल्लीच्या कार बऱ्यापैकी मेन्टेनन्स फ्री असतात, परंतु तरीही गाडीचे जीवनमान वाढवण्यासाठी वेळोवेळी मेन्टेनन्सची खात्री करून घेतलेले केव्हाही चांगले. कार घेताना सुरक्षा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कारमध्ये एबीएस लॉकिंग सिस्टीम व एअर बॅग्ज आहेत का याची चाचपणी करून घ्यावी. एबीएस लॉकिंग ही ब्रेकिंग सिस्टीम आहे. पारंपरिक ब्रेक पद्धतीत अचानक ब्रेक दाबल्यास चक जाम होऊन गाडी घसरत जाते. हे टाळण्यासाठी एबीएस खूप उपयुक्त ठरते. एअर बॅग्ज हे आजच्या काळात आवश्यक फीचर झालंय. कारण अपघात होताना मोठय़ा शारीरिक आघातापासून फक्त एअरबॅग्जच वाचवू शकतात. इतरवेळी एअर बॅग्ज या स्टेअरिंग व सीट यांच्यात फीट केलेल्या असतात. जेव्हा अपघात होतो त्याचक्षणी (सेकंदाचा दहावा भाग) इतक्या कमी वेळात एक छोटा ब्लास्ट होऊन बॅग्ज मध्ये हवा भरली जाते आणि एअर बॅग्ज फुगल्यावर चालक आणि डॅशबोर्ड यांच्यातली टक्कर टळते. आणि प्रवासी आणि चालक यांचे आघातापासून रक्षण होते. आपण बऱ्याचदा पॉवर स्टेअिरग सिस्टीमबद्दल ऐकतो. ही गाडी वळवताना लागणारे कष्ट कमी करते. आणि खूप सहजरित्या जास्त वेगातसुद्धा सहजतेने कार वळू शकते. अशाप्रकारे ही फीचर्स कार घेताना लक्षात घ्यावी. इतर आधुनिक बदल आपण भागात पाहूया.
कार घ्यायचीय.. ही घ्या चेकलिस्ट
स्वतच्या मालकीची कार असावी हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते. अनेकदा गाडी घेताना आपण तिच्या लूक्सचा, त्यात देण्यात आलेल्या आरामदायी सुविधांचा जास्त विचार करतो.
First published on: 03-04-2014 at 03:56 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need a car take a checklist