गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अनेकांनी नव्या वर्षांत गाडी घेण्याचा संकल्प केला असेल. त्यापकी अनेकांचा हा संकल्प तडीलाही गेला असणार, यात शंकाच नाही; पण असेही काही जण असतील की, त्यांना विविध अडचणींमुळे यंदा आपल्या दारासमोर नवी कोरी गाडी उभी करता आली नसेल. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात गाडय़ांच्या किमती वाढल्याने आपल्या आवडत्या गाडीचं आवडतं मॉडेल महाग झालं, अचानक घराची दुरुस्ती समोर आली, घरात एखादं कार्य निघालं.. एक ना अनेक अडचणींमुळे गाडी घेण्याचा बेत पुढे ढकलावा लागला असेल, तर त्याबद्दल खंत मानून घेऊ नका. कारण नव्या वर्षांत ऑटोमोबाइल कंपन्या आपली नवीन मॉडेल्स भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेत उतरवत आहेत. ही मॉडेल्स आकर्षक आहेत, यात शंकाच नाही; पण बदलत्या टेक्नॉलॉजीच्या युगात ती अद्ययावतही असतील. त्यामुळे यंदाच्या वर्षांत जे निसटले, ते दामदुपटीने पुढील वर्षांत मिळण्याची शक्यता आहे. या गाडय़ांमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गाडय़ांबरोबरच २५-३०-५० लाखांच्या गाडय़ांचाही समावेश आहे; पण तूर्तास आपण अशा महागडय़ा गाडय़ांकडे पाहण्यापेक्षा आपल्या खिशाकडे नजर टाकून परवडणाऱ्या नव्या गाडय़ांकडे पाहू या. अशा काही गाडय़ांपकी काही निवडक गाडय़ांची माहिती तुमच्यासाठी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा झिका
नवीन वर्ष टाटा मोटर्ससाठी खूपच आशादायक आहे. या वर्षांत टाटाच्या अनेक महत्त्वाकांक्षी गाडय़ा बाजारपेठेत येत आहेत. त्यापकीच एक म्हणजे टाटा झिका! टाटा इंडिका गाडीने टाटा मोटर्सला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील आणि मायलेजच्या दृष्टीनेही सोयीची म्हणून इंडिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. याच गाडीच्या धर्तीवर टाटाने झिका ही गाडी बाजारात आणण्याचे ठरवले आहे. हॅचबॅक श्रेणीतील ही गाडी लुक्सच्या बाबतीत इंडिकाच्या जवळ जाणारी असली, तरी ती पाहताना शेव्हरोले स्पार्कची आठवण आल्याखेरीज राहत नाही. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन इंजिन्समध्ये उपलब्ध आहे. ११९९ सीसी पेट्रोल इंजिन आणि १०४७ सीसी डिझेल इंजिनमुळे गाडी दणकट असणार, यात शंकाच नाही. गाडी अद्ययावत आणि उच्च श्रेणीतील दिसावी, यासाठी गाडीचा आकार, काही कव्‍‌र्हज खूपच छान पद्धतीने डिझाइन केले आहेत. इंडिका ही गाडी चांगल्या आणि आरामदायक केबिन स्पेससाठी ओळखली जाते. नवीन झिका ही गाडी इंडिकाच्याच धर्तीवर असल्याने या गाडीची केबिन स्पेस किमान इंडिकाइतकी असेल, यात शंका नाही. या गाडीची किंमत ३.९५ लाख ते ५.५० लाख या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही गाडी २०१६ च्या पहिल्या तिमाहीतच बाजारात येईल.

डॅटसन ऑन-डू
निसान कंपनीचा भाग असलेल्या डॅटसन या ऑटोमोबाइल कंपनीने भारतात गो आणि गो प्लस या गाडय़ांच्या मदतीने आपली जागा निर्माण केली आहे. गो आणि गो प्लस या दोन्ही गाडय़ा हॅचबॅक आणि कॉम्पॅक एसयूव्ही श्रेणीतील आहेत; पण डॅटसन नव्या वर्षांत पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत सेडान प्रकारातील गाडी आणत आहे. डॅटसन ऑन-डू ही गाडी या कंपनीने पहिल्यांदा रशियामध्ये लॉन्च केली. संपूर्ण कुटुंबासाठीची सेडान गाडी, ही भारतीयांची गरज भागवणाऱ्या ह्युंदाई एक्स-सेंट, होंडा अमेझ, टाटा झेस्ट, शेव्हरोले सेल अशा गाडय़ा भारतीय बाजारपेठेत आजही आहेत. नव्या वर्षांत येणाऱ्या डॅटसन ऑन-डू या गाडीला या सर्व गाडय़ांशी स्पर्धा करावी लागणार आहे. आपल्या श्रेणीतील उत्तम केबिन स्पेस, १.६ लिटर, ४ सििलडर इंजिन, फाइव्ह स्पीड मॅन्युअल गीअरबॉक्स यांनी ही गाडी सजलेली असेल. या गाडीची अंदाजे किंमत साडेचार लाखांपासून सुरू होणार आहे.

टाटा मेगापिक्सेल
टाटा मोटर्सच्या गाडय़ांचा आकार, हा ऑटोमोबाइल जगतातील काहीसा चेष्टेचा विषय मानला जातो. इंडिका असो, वा इंडिगो, टाटाच्या गाडय़ांचा तोंडवळा सारखाच असतो, असं म्हणतात. मात्र हा समज सर्वप्रथम नॅनोने धुडकावून लावला आणि नव्या वर्षांत या समजाला सुरुंग लावणारी गाडी टाटा मोटर्स बाजारात आणत आहेत. या गाडीची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू असून टाटा मेगापिक्सेल असे या गाडीचे नाव आहे. ही गाडी लिथियम आयन फॉस्फेट बॅटरीवर चालणारी असून एक्स्टेंडेड इलेक्ट्रिकल व्हेइकल श्रेणीत मोडते. त्याशिवाय या गाडीला पेट्रोल इंजिनही देण्यात आले आहे. एकदा चार्ज केल्यावर ही गाडी ९०० किमीपर्यंत धावू शकते, तर बॅटरीच्या साहाय्याने ही गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये १०० किलोमीटर एवढी धावू शकणार आहे. टाटा पिक्सेल या गाडीप्रमाणेच या गाडीच्या चार चाकांना वेगवेगळा कंट्रोल असल्याने या गाडीची टìनग रेडियस केवळ २.८ मीटर एवढा कमी आहे. या गाडीचा पुढील आणि मागील दरवाजा बाहेरच्या बाजूला येऊन मागे-पुढे होऊन उघडला जातो. त्यामुळे गाडीत चढणे किंवा उतरणे खूपच सोपे आहे. मात्र हॅचबॅक प्रकारातील ही गाडी फक्त चौघांसाठीच उपयुक्त आहे. या गाडीची अंदाजे किंमत पाच लाखांपासून सात लाखांपर्यंत आहे.

मारुती एक्सए अल्फा/ वायबीए/व्हिटारा ब्रेझ्झा
भारतीय ऑटोमोबाइलचा चेहरा म्हणून विख्यात असलेल्या मारुती कंपनीची पहिलीवहिली कॉम्पॅक एसयूव्ही गाडी २०१६ च्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. या गाडीचे नाव अजून ठरले नसले, तरी या गाडीच्या तीन नावांबद्दल बाजारात चर्चा आहे. एक्सए-अल्फा, वायबीए किंवा व्हिटारा ब्रेझ्झा या तीन नावांनी सध्या ओळखल्या जाणाऱ्या या गाडीच्या लुक्सची चर्चा आहे. १.२ लिटर पेट्रोल, १.३ लिटर डिझेल आणि कदाचित १.० लिटर टबरे पेट्रोल अशा तीन इंजिन श्रेणींमध्ये ही गाडी उपलब्ध होणार आहे. फोर्ड ईकोस्पोर्ट किंवा रेनॉ डस्टर या कॉम्पॅक एसयूव्ही गाडय़ांना टक्कर देण्यासाठी मारुतीने ही गाडी बाजारात आणण्याचे ठरवले आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या दिल्ली ऑटो एक्सपोच्या आधी ही गाडी लॉन्च होण्याची शक्यता आहे. या गाडीची किंमत आठ ते १० लाख एवढी किंवा त्याहूनही कमी असेल, असा अंदाज आहे.

शेव्हरोले स्पीन
हॅचबॅक आणि एसयूव्ही गाडय़ांच्या चलतीनंतर आता एमपीव्ही किंवा मल्टी पर्पज व्हेइकल्सचे दिवस आले आहेत. सध्या डॅटसन गो प्लस, होंडा मोबिलिओ, मारुती-सुझुकी एर्टगिा, रेनॉ लॉजी या एमपीव्हीज् भारतात उत्तम चालत आहेत; पण शेव्हरोलेनेही या सेगमेण्टमध्ये उतरण्याची तयारी चालवली असून त्यासाठी त्यांनी नव्या वर्षांच्या सुरुवातीला शेव्हरोले स्पीन ही गाडी बाजारात आणण्याचे ठरवले आहे. शेव्हरोले बीट या गाडीच्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या इंजिनीअर्सनी ही स्पीन गाडी बनवली असून बीटपेक्षा अधिक दणकट, तरीही आखीव डिझाइन असलेली गाडी देण्याचं आव्हान त्यांनी पेललं आहे. सात जणांसाठी बनलेल्या या गाडीच्या मागच्या सीट्स फोल्ड केल्यावर गाडीत सामान ठेवण्याची क्षमता ८६४ लिटर एवढी आहे. मात्र अशा वेळी फक्त पाचच जण या गाडीत बसू शकतात. या गाडीच्या सीट ५० वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करता येऊ शकतात, असा दावा आहे. १.३ लिटर डिझेल, १.५ लिटर पेट्रोल इंजिनमुळे ही गाडी नक्कीच उत्तम ड्रायिव्हग एक्सपिरियन्स देऊ शकते. या गाडीची किंमत ६.८ लाख ते १०.५ लाख यादरम्यान असेल.
रोहन टिल्लू – rohan.tillu@expressindia.com

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New car launches in