नवीन वर्षांची सुरुवात इंधन दरवाढीच्या बातमीने झाली आहे. हरकत नाही, हे म्हणजे मागील पानावरून पुढे सुरू असंच आहे. तरीही नव्या वर्षांचे संकल्प पूर्ण करण्याचा प्रत्येकजण कसोशीने प्रयत्न करणार यात शंका नको. गाडी घेण्याचा संकल्प जर तुमच्यापकी कोणी केला असेल तर या वर्षांत कोणत्या नव्या गाड्या बाजारात येत आहेत, त्याची ही माहिती..
* शेव्हल्रे बीट फेसलिफ्ट
या फंकी आणि स्टायलिश गाडीने सर्वच कारप्रेमींची वाहवा मिळवली आहे. मात्र, यंदाच्या वर्षांत बीटला नवा चेहरा प्राप्त होणार आहे. गाडीला ताजा लूक देण्यासाठी तिला रिप्रोफाइल्ड बम्पर्स असतील. मोठय़ा आकाराचे हनीकोंब ग्रिल आणि विविध िवग मिर्स हा तिचा नवा साज असेल. अंतर्गत व्यवस्था मात्र तशीच राहण्याची शक्यता आहे.
इंजिन : १.२ लिटर पेट्रोल, १.० लिटर डिझेल
बाजारात कधी येणार : मार्च, २०१३
प्रस्तावित किंमत : ३.८ ते ५.७ लाख रुपये.
* फियाट पुंटो इव्हो
गेल्या वर्षी टाटा मोटर्सशी केलेले सेल्स आणि सर्ह्विस टाय-अप यंदा नसेल. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी फियाटला नव्या गाडीची निर्मिती करणे
इंजिन : १.२ लिटर पेट्रोल, १.४ लिटर पेट्रोल, १.३ लिटर डिझेल
बाजारात कधी येणार : जून, २०१३
प्रस्तावित किंमत : ३.८ ते ५.७ लाख रुपये.
* ह्य़ुंडाई न्यू आय१०
मागच्या वर्षी ह्य़ुंडाई आय१० ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाल नाही. परंतु यंदाच्या सप्टेंबरात ही गाडी नक्कीच धमाका करणार आहे असे दिसते. नव्या रूपात सादर होणारी ही गाडी आधीच्या रूपापेक्षा नक्कीच वेगळी आहे. तिचा आकार सध्यापेक्षा अधिक मोठा असेल तसेच अंतर्गत रचनाही ऐसपस असेल. सध्या ह्य़ुंडाईच्या आर अँड डी विभागात सुरू असलेल्या रेल-डिझेल इंजिनावरील संशोधन हा हॉट टॉपिक आहे. नव्या आय10 मध्ये बहुधा हे इंजिन बसवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाडीचा पिकअप वाढणार आहे.
इंजिन : १.० लिटर पेट्रोल, १.२ लिटर पेट्रोल, १.१ लिटर डिझेल
बाजारात कधी येणार : सप्टेंबर, २०१३
प्रस्तावित किंमत : ३.५ ते ६ लाख रुपये.
* मिहद्रा ई२०
भारताची पहिली इलेक्ट्रिक कार असलेल्या रेवाचे हे पुढचे मॉडेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिचे लाँचिंग झाले खरे. मात्र, या वर्षांतच ती रस्त्यावर धावणार आहे. या गाडीचे आकर्षण सध्या आहे ते वाढत्या इंधनदरांमुळे. त्यामुळे मिहद्राच्या या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल असा मार्केट पंडितांचा होरा आहे. 48 व्होल्टची लिथियम आयन बॅटरी एकदा चार्च केली की ही कार किमान 100 किमीपर्यंत धावेल असा कंपनीचा दावा आहे.
इंजिन : इलेक्ट्रिक
बाजारात कधी येणार : २०१३
प्रस्तावित किंमत : साडेपाच ते ६ लाख रुपये.
* मारुती ए स्टार फेसलिफ्ट
गेल्या वर्षी अत्यंत धीम्या गतीने ए स्टारची विक्री झाली. मात्र, यंदा ही गाडी आणखी जोमाने बाजारात उतरणार आहे. चीनमधील चेंगडू येथे नुकत्याच झालेल्या प्रदर्शनात या गाडीला चांगला प्रतिसाद लाभला. नव्या आकारात ही गाडी अधिक आकर्षक दिसते. मोठे आणि अँगलमध्ये असलेले हेडलॅम्प आणि वैविध्यपूर्ण रिअर.
इंजिन : १.० लिटर पेट्रोल
बाजारात कधी येणार : जून, २०१३
प्रस्तावित किंमत : ३.७ ते ४.५ लाख रुपये.
* टाटा नॅनो व्हेरिएंट्स
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून रतन टाटा पायउतार झाले असले तरी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची जपणूक टाटा समूह करणारच यात शंकाच नाही. टाटांचा आवडता प्रोजेक्ट असलेल्या नॅनोला त्यामुळे एक वेगळेच महत्त्व आहे. यंदाच्या वर्षांत नॅनो नव्या ढंगात दिसणार आहे. त्यात प्रमुख आकर्षण असेल ते पॉवर स्टिअिरगचे. अंतर्गत रचनेतही बदल होऊ घातले आहेत. या बदलांमुळे नॅनोची किंमत २५ हजारांनी वाढणार आहे.
इंजिन : ०.६ लिटर पेट्रोल
बाजारात कधी येणार : २०१३
प्रस्तावित किंमत : २.२ लाख रुपये.
* फोक्सवॅगन पोलो ऑटो
पोलोकडून फोक्सवॅगनला जी अपेक्षा होती त्याची पूर्तता करण्यात ही गाडी मागील वर्षी काहीशी अपयशी ठरली. मात्र, भारतीय बाजारपेठेचा आकारउकार लक्षात घेऊन फोक्सवॅगनने पोलोला पुन्हा नव्या जोमाने बाजारात उतरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल कारचे एॅटोमॅटिक व्हर्जन तयार करण्याचा फोक्सवॅगनचा प्रयत्न आहे. तसेच डिझेल इंजिनाचा आकार कमी करण्याचाही फोक्सवॅगनचा प्रस्ताव आहे. मात्र, डिझेल गाडी २०१४ पूर्वी उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता नाही.
इंजिन : १.२ लिटर टबरे पेट्रोल
बाजारात कधी येणार : मार्च, २०१३
प्रस्तावित किंमत : ८ लाख रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा