ह्य़ुंदाईच्या क्रेटा या नव्याकोऱ्या एसयूव्हीचे बाजारात अद्याप आगमन झालेले नसले तरी तिच्या प्री-बुकिंगने मात्र इतिहास रचला आहे. तब्बल दहा हजार जणांनी क्रेटाचे बुकिंग केले आहे. २१ जुलै रोजी क्रेटाचे लाँचिंग होणार आहे. बेस, एस, एस प्लस, एसएक्स, एसएक्स प्लस आणि एसएक्स (ओ) या सहा प्रकारांमध्ये क्रेटा उपलब्ध असेल. रेनॉची डस्टर, निस्सानची टेरानो, मारुतीची आगामी एस क्रॉस व महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडय़ांशी क्रेटा स्पर्धा करेल.
स्कॉर्पिओचा नवा लूक
मुंबई : महिंद्राच्या स्कॉर्पिओची क्रेझ आजही कायम आहे. स्कॉर्पिओच्या या लोकप्रियतेत आता आणखी भर पडणार आहे. आगामी काळात स्कॉर्पिओ नव्या रुपात सादर होणार आहे. ऑटोमॅटिक स्वरुपात स्कॉर्पिओचे लाँचिंग होणार असल्याचे समजते. गाडीच्या किमतीविषयी ठोस माहिती मिळू शकलेली नसली तरी १४ लाखांपर्यंत ही गाडी उपलब्ध असेल, असा अंदाज आहे.

Story img Loader