आतापर्यंत आपण या सदराच्या माध्यमातून गाडीच्या विविध भागांची आणि त्यांच्या कार्यपद्धतींची माहिती जाणून घेतली. आता गरज आहे प्रॅक्टिकलची. म्हणजे सर्वसाधारण चित्र असे असते की, आपण गाडी घेतली की उत्साहात फिरायला निघतो. मात्र, दुर्दैवाने ती कुठे बंद पडली तर मग गॅरेज आणि मेकॅनिकच्या शोधासाठी धावाधाव करावी लागते. नाहीच तर मग दुसऱ्यांच्या मदतीवर विसंबून राहावे लागते. हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी तरी येतोच. त्यातूनच मग शहाणपण येत असते. असो. मुद्दा असा आहे की, गाडी रस्त्यावर अचानक बंद पडली आणि आसपास मेकॅनिक उपलब्ध होण्याची शक्यता अगदीच कमी असली तर आपणच आपल्या गाडीचे मेकॅनिक व्हावे, हे उत्तम. मग गाडी बंद पडलीच तर काय काय प्रथमोपचार करावेत याची चर्चा आता आपण या सदरातून करणार आहोत. फार नाही पण काही अगदीच प्राथमिक गोष्टी माहीत असल्या तरी पुरेसे आहे. उदाहरणार्थ गाडीचे इंजिन, कूिलग सिस्टीम, ऑइल सिस्टीम, रेडिएटर, वॉटर पंप सिस्टीम यांची जुजबी माहिती असली तर त्यातील दोष शोधता येतात आणि बंद पडलेली गाडी तात्पुरता का होईना, अगदी गॅरेजपर्यंत नेण्यापर्यंत, दुरुस्त करता येते. त्यामुळे कारनाम्याच्या माध्यमातून आपण या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत. गाडी बंद पडल्यास काय करावे याची उत्तरे यात मिळतीलच शिवाय तुम्हालाही असा अनुभव आलाय का, त्यावेळी तुम्ही काय केले याचे अनुभवही तुम्ही शेअर करू शकणार आहात. किंवा गाडीसंदर्भात तुम्हाला काही अडचणी असल्यास त्याबद्दलही खुशाल विचारा.. तूर्तास एवढेच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा