इंधनाचे वाढते दर आणि फुगत चाललेले कर या कात्रीत सध्या ऑटो इण्डस्ट्री सापडली आहे. त्याचा अंतिम परिणाम म्हणजे आटत चाललेली वाहन खरेदी. आपल्या उत्पादनाचा खप व्हावा यासाठी मग उत्पादक कंपन्या वेगवेगळ्या क्लृप्त्या योजतात. तसंच काहीसं सध्या ऑटो क्षेत्रात सुरू आहे. विविध कंपन्यांचे डीलर्स ग्राहकांना आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी विविध योजना दाराशी मांडू लागले आहेत. त्याचा घेतलेला हा कानोसा..
ऑडी
ऑडीच्या खरेदीवर मोठय़ा प्रमाणात डिस्काऊंट्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ए४च्या २.० टीडीआय व्हेरिएंटच्या संभाव्य खरेदीदारांना तर सुमारे चार लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो. मात्र, त्यात बिझनेस एडिशनचा समावेश करण्यात आलेला नाही.
ह्य़ुंदाई
ह्य़ुंदाईच्या आय१० खरेदीवर मोफत विम्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे १७ हजार रुपयांची बचत होणार आहे, मात्र ही बचत व्हेरिएंटवर अवलंबून असेल. नऊ हजारांचा कॅश डिस्काऊंट अधिक पाच हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काऊंट या आणखी जमेच्या बाजू. तुमची सध्याची कार ह्य़ुंदाईला विकली तर एक्स्चेंज बोनसने तुमची २० हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. सोनाटाच्या खरेदीवरही चांगला डिस्काऊंट उपलब्ध आहे.
मिहद्रा
क्वांटोच्या खरेदीवर मिहद्राने २० हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट आणि २० हजार रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस उपलब्ध आहे. झायलोच्या खरेदीवरही ५२ हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट उपलब्ध आहे, मात्र हे संबंधित व्हेरिएंटवर आधारित असेल. तसेच व्हेरिटोही मोफत विम्यासह उपलब्ध आहे. तिच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हर्जन्सच्या खरेदीवर १० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि सात हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट उपलब्ध आहे.
शेव्हल्रे
शेव्हल्रे क्रूझच्या सर्व व्हेरिएंट्सवर मोफत विमा योजना आहे. तुम्ही कोणत्या व्हेरिएंटची निवड करता त्यावर तुमची बचत अवलंबून असेल. तसेच तुम्ही तुमच्याकडील कार त्यांना विकली तर तुम्हाला २० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनसही मिळू शकतो.
निस्सान
निस्सान सनीची पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंट्सच्या खरेदीवर १७ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट कंपनीने देऊ केला आहे. तुम्ही कोणत्या व्हेरिएंटची निवड करता त्यानुसार हा डिस्काऊंट बदलूही शकतो. तुम्हाला तुमची जुनी कार देऊन नवीन निस्सान घ्यायची असेल तर एक्स्चेंज बोनसचा लाभ जरूर मिळू शकतो. त्यामुळे तुमची २० हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. इव्हालियाच्या २०१२च्या स्टॉकमधील एखादी गाडी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला त्यावर किमान सव्वा लाख रुपयांपर्यंतची बचत करता येऊ शकेल.
फोक्सवॅगन
फोक्सवॅगनच्या पस्सातवर सध्या आकर्षक सूट उपलब्ध आहे. या लक्झरी सलूनवर सध्या दोन लाखांपर्यंतची रोख बचतीचा पर्याय उपलब्ध आहे. पस्सातच्या सर्व प्रकारच्या व्हेरिएंटसवर ही सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही लक्झुरिअस सलूनच्या शोधात असाल तर पस्सातचा पर्याय नक्कीच पडताळून पाहायला हवा. पोलो कम्फर्टलाइन आणि हायलाइन यांच्या विक्रीवरही डीलर्सनी मोफत विम्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे २४ हजारांपर्यंतची बचत होईल. सर्व प्रकारच्या डिझेल व्हर्जन्सच्या खरेदीवरही मोफत विमा उपलब्ध आहे. त्यामुळे २६ हजार रुपयांची बचत होईल आणि त्याच्या जोडीला तुम्ही तुमची जुनी कार कंपनी शोरूमला विकली तर त्यावर १० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस उपलब्ध आहे.
बीएमडब्ल्यू
बीएमडब्ल्यू ३ सीरिज सलून साडेतीन लाखांच्या डिस्काऊंटवर उपलब्ध आहे. सर्व व्हेरिएंट्सवर हा डिस्काऊंट लागू आहे. बीएमडब्ल्यूच्या शोरूम्सवर ५ सीरिज सध्या पाच लाखांच्या डिस्काऊंटने उपलब्ध आहे. मात्र, हे सर्व उपलब्धतेवर अवलंबून आहे. तसेच ऑफरच्या अंतिम मुदतीपर्यंतच उपलब्ध आहे.
मर्सडिझ-बेन्झ
मर्सडिीझ-बेन्झच्या शोरूम्समध्ये सी श्रेणीतील कार आकर्षक डिस्काऊंटमध्ये विक्रीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपलब्ध स्टॉकच्या आधारावर तुम्हाला काही व्हर्जन्सवर चक्क तीन लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो. ई श्रेणीतील कारही पाच लाखांपर्यंतच्या डिस्काऊंट्ससह उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी स्टॉकची उपलब्धता आहे की नाही याची शहानिशा करायला हवी.
टोयोटा
सर्वसाधारणपणे टोयोटातर्फे फार कमी वेळा ऑफर्स दिल्या जातात. मात्र, मंदीच्या विळख्यात सापडलेल्या ऑटो क्षेत्राला टोयोटा तरी कशी अपवाद ठरेल. तुम्ही टोयोटाच्या शोरूममध्ये तुमची जुनी कार घेऊन गेलात तर तुम्हाला चक्क २० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस टोयोटाने ऑफर केला आहे. टोयोटा कोरोला अल्टिसवरील इन्शुरन्स खर्च निम्म्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे २९ हजार रुपयांची बचत होणार आहे. १० हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनसही टोयोटाने ग्राहकांना देऊ केला आहे.
टाटा
आरियावर टाटा मोटर्सने मोठा डिस्काऊंट ऑफर केला आहे. आरियाच्या २०१२मधील सर्व मॉडेल्सचा त्यात समावेश असेल. मात्र, प्युअर एलएक्सचा त्याला अपवाद आहे. आरियावर तब्बल दोन लाखांचा डिस्काऊंट उपलब्ध आहे. २०११मधील मॉडेल्सवर तर तब्बल अडीच लाखांचा डिस्काऊंट आहे. तसेच २०१२ आणि २०१३च्या मॉडेल्सवर तुम्हाला ५० हजारांचा एक्स्चेंज बोनसही देऊ करण्यात आला आहे. मात्र, या सर्व योजना संबंधित गाडय़ांच्या उपलब्धतेवरच (स्टॉक) अवलंबून आहे.
मारुती
तुम्हाला तुमच्या सध्याच्या कारचा कंटाळा आला असेल किंवा तुम्ही परफेक्ट फॅमिली कारच्या शोधात असाल तर मारुती वॅगन आर हा एक चांगला पर्याय आहे. सध्या मारुतीच्या शोरूममध्ये जुन्या कारच्या बदल्यात वॅगन आरच्या खरेदीवर २० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस उपलब्ध आहे. तसेच रोखीने पसे दिले तर २८ हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंटही उपलब्ध करण्यात आला आहे. म्हणजे एकूण बचत होणार ४८ हजार रुपयांची.
अल्टोच्या दोन्ही व्हर्जन्सवरही खास ऑफर उपलब्ध आहेत. के१०च्या खरेदीवर २० हजारापर्यंतचा कॅश डिस्काऊंट तर २० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस उपलब्ध आहे, तर नव्या कोऱ्या अल्टो८००च्या खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट आणि १० हजार रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस उपलब्ध करून देण्यात आला आहे.
(सूचना : वरील सर्व ऑफर्स सर्व ठिकाणच्या शोरूम्सवर उपलब्ध असतीलच असे नाही. विविध ठिकाणी त्या बदललेल्याही असू शकतील किंवा मर्यादित प्रमाणावरच या ऑफर्स उपलब्ध असू शकतील.)