महिन्द्रा टु व्हिलर्स आता स्वतंत्रपणे भारतीय बाजारपेठेत उतरली असून डय़ुरो व रोडिओ या दोन स्कूटर्सच्या पुढील आवृत्तीही आता त्यांनी दुचाकीप्रेमींसाठी आणली आहे. रोडिओची यापूर्वीची आवृत्ती बऱ्याच अंशी सुधारून, इंजिनमध्ये काही सुधारणा घडवून रोडिओ आरझेड या नावाने आता बाजारात उतरविली आहे. मोटारसायकलसारखी झटदिशी गती घेणारी रोडिओ-आरझेड ही १२५ सीसीची स्कूटर आहे. वजन, वेग, आसनव्यवस्था, नियंत्रणक्षमता यांचा विचार करता रोडिओ ही नव्या जमान्याची व नवीन पिढीसाठी चांगली स्कूटर म्हणावी लागेल. आता महिलाही गतीच्या तुलनेत मागे नाहीत, किंबहुना ही बाब लक्षात घेतली तर महिलांनाही गतीमान स्कूटर नियंत्रणात ठेवून व सहजपणे चालविता येईल अशी महिन्द्राची रोडिओ-आरझेढ ही स्कूटर आहे.
क्षणार्धात वेग घेणारी रोडिओ मोटारसायकलीसारखी झपकन पुढे जाते, वर्दळीच्या ठिकाणी त्यामुळे ती जरा जपून चालवावी लागेल, मुंबईसारख्या वाहतुकीमध्ये नियंत्रितपणे व आवश्यक तेव्हा झटक्यात वेग वाढवून पळविणे व सिग्नल पार करणे ज्यांना आवडते अशांना स्कूटर असूनही मोटारसायकलीसारखा आनंद देणारी व तसा फायरींगच्या आवाजाचाही आनंद देणारी रोडिओ नक्कीच आवडणारी ठरू शकेल.
गतीमानता व मायलेज याबाबत मात्र मायलेज अतिगतीमानतेत व वाहतुकीच्या वर्दळीत पळविणे मायलेज कमी देणारे ठरू शकेल. मात्र एकसंघ गतीतून रोडिओ शहराबाहेर चालविताना आरामदायी व गतीचा आनंद देणारी ठरू शकेल. शॉकअॅब्सॉर्बर्स चांगले असून छोटी चाके असतानाही खड्डय़ांचा खडतरपणा तसा जाणविणारा नाही. अर्थात स्कूटर असल्याने अशा गोष्टी जपून कराव्यात कारण स्कूटर चालविताना मागील प्रवासी जर काहीसा उंच वा वजनदार असेल तर स्कूटरचा समतोल राखणे काहीसे कठीण होते. विशेष करून मुंबई-ठाण्यासारख्या शहरात असलेल्या वाहतूक व रस्ता यांची स्थिती पाहाता हा समतोल राखणे कठीण होऊ शकते. अशावेळी स्कूटर अतिनियंत्रित वेगात न्यावी लागेल. स्कूटरची झपकन वेग घेण्याची शैली अशा ठिकाणी काळजीपूर्वक हाताळावी लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा