मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत. त्यापकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहेत.
३३) प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे. कलम ११२,११३,१२१,१२२,१२५,१३२,१३४,१८५,१८६,१९४, २०७.
सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत.
कलम १८५ – अमली पदार्थ किंवा मद्य यांच्या नशेत झिंगलेल्या चालकाने वाहन चालविणे जर एखादी व्यक्ती वाहन चालवताना किंवा चालवण्याचा प्रयत्न करताना
(अ) जर त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये ३० मिगॅ्र प्रति १०० मिली लीटरपेक्षा जास्त अल्कोहोल आहे, असे ब्रेथ अनालायझर टेस्टमध्ये आढळून येईल किंवा
(ब) जर सदर व्यक्ती अमली पदार्थाच्या नशेत असल्यामुळे वाहनावर योग्य ताबा ठेवू शकत नसेल, असे आढळून आले असेल अशा व्यक्तीला शिक्षा होते. सदर शिक्षा पहिल्या गुन्ह्याकरिता सहा महिन्यापर्यंत कैद किंवा रु.२००० हजापर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा असते.
दुसऱ्या गुन्ह्याकरिता किंवा त्यानंतरच्या गुन्ह्याकरिता सदर गुन्हा तीन वर्षांच्या आत पुनश्च केलेला असेल तर दोन वर्षांपर्यंत कैद किंवा रु. ३००० हजापर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होते.
स्पष्टीकरण- या कलमाखाली अमली पदार्थ कोणते आहेत यांची व्याख्या केंद्र सरकारने स. ओ. ४४१(ए) दिनांक १२/०६/१९८९ अन्वये केलेली आहे. क्रमश:
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा