’फोर्ड फिगोचे कोणते व्हर्जन चांगले आहे.

– चंद्रशेखर शेलार

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

’फोर्ड फिगो डिझेल ही गाडी १.५ लिटर १०० बीपीएस इंजिनमध्ये येते. हॅचबॅक श्रेणीतील ही सर्वात ताकदवान गाडी आहे. तुम्ही डिझेल व्हर्जनला प्राधान्य द्यावे.

’क्विड गाडी कशी आहे. मला ती परवडेल का? माझा रोजचा प्रवास १० ते १५ किमी आहे.

– विजय वाघमारे

’तुम्ही फक्तशहरातच ड्रायिव्हग करीत असाल तर क्विड चांगली गाडी आहे. कारण ६० ते ७० च्या पुढे ही गाडी आवाज करायला लागते. तुम्ही अल्टो के१० चा विचार करा.

’मी माझ्या कुटुंबासाठी एक कार घेऊ इच्छितो. माझे बजेट तीन-साडेतीन लाखांपर्यंत आहे. कोणती कार सुचवाल? मी क्विड किंवा स्पार्क यापकी कार घेण्याचा विचार करतो आहे. काय फायदे किंवा तोटे आहेत? तुम्ही दुसरी कार सुचवाल का? शोरूम किंमत आणि फायनल किंमत यात किती फरक असतो?

– प्रकाश सराफ

’होय, कमी वापरासाठी क्विड ही एक उत्तम कार आहे. शिवाय हिच्यात फीचर्सही चांगले आहेत. स्पार्क तुम्हाला महाग पडेल. ऑन रोड किंमत साधारणत: १२ ते १५ टक्के जास्त असते.

’रेनॉ क्विडचा परफॉर्मन्स ह्य़ुंदाई ईऑन किंवा मारुती अल्टो यांच्या तुलनेत कसा आहे. ती या दोन्हींपेक्षा चांगली आहे का. क्विडमधील सेफ्टी फीचर्सबद्दल आपले मत काय आहे.

– गिरीश कुलकर्णी, पुणे.

’क्विड ही शहरात चालवायला चांगली आहे. कमी किमतीत क्विडमध्ये खूप चांगले सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. मात्र, हायवेला ही गाडी तितकीशी चांगली नाही. हिच्या इंजिनाचा आवाज यायला लागतो व व्हायब्रेट व्हायला लागते. त्यामुळे मी तुम्हाला के १० किंवा आय १० या गाडय़ा सुचवेन.

’मला नवीन कार घ्यायची असून माझे बजेट सात ते आठ लाख रुपये आहे. मला टोयोटा इटिऑस कार आवडते. हीच घ्यावी अशी माझी इच्छा आहे. या गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, हे तुम्ही सांगू शकाल काय. या गाडीचे सस्पेन्शन कसे आहे, ते सांगा. मी ही गाडी घेऊ की डिझायरचा विचार करू. – नचिकेत भातलोंढे, लातूर</p>

’इटिऑस कार ही वजनाने हलकी आहे. मात्र, हिचा पिकअप खूप छान आहे. बूट स्पेसही उत्तम आहे. त्यामुळे या गाडीचा वापर बहुतेकदा टॅक्सी सेगमेंटमध्ये जास्त केला जातो. तुमच्या कुटुंबात तीन-चार जण असतील आणि तुम्हाला चांगल्या सस्पेन्शनची गाडी हवी असेल तर फोक्सवॅगन पोलो ही गाडी उत्तम आहे.

’मला नवीन मारुती बलेनो पेट्रोलबद्दल सांगाल का? शेवल्रे सेल हॅचबॅक, ह्य़ुंदाई ग्रान्ड आय १० आणि मारुती बलेनो यापकी कोणती गाडी घेण्याबद्दल तुम्ही सुचवाल? मी परदेशात नोकरीला असून वर्षांतून दोन महिने भारतात असतो. मला माझ्यासाठी सुट्टीमध्ये फिरण्यासाठी कार घ्यायची आहे. माझे बजेट ७ लाखापर्यंत आहे आणि मला

हॅचबॅक सेग्मेंटमधील आकाराने मोठी कार हवी आहे.

– सचिन कुल्ली.

’तुम्ही जर वर्षांतून दोनदाच कार वापरत असाल तर मारुतीची कार घ्यावी. तुम्हाला तुमच्या बजेटात स्विफ्ट घेण्याचा सल्ला मी देईल. पण जर ऑटोगीअर कार हवी असेल तर नक्कीच सेलेरिओ हा पर्याय सुचवेन. मारुतीचे इंजिन आठ दिवस न वापरताही उत्तम राहते.

’मी निमशासकीय नोकरीत आहे. माझे बजेट पाच लाख रुपये असून मला कार घ्यायची आहे. क्विड किंवा वॅगन आर यांपकी कोणती चांगली ठरेल.

– शैलेश िशदे

’मी तुम्हाला वॅगन आर घेण्याचा सल्ला देईल. मात्र, तुम्हाला आरामदायी गाडी हवी असेल आणि तुम्ही कुटुंबात पाच जण असाल तर नवीन फोर्ड फिगो ही उत्तम गाडी ठरेल. डिझेलवर चालणारी ही गाडी घ्या.

’मला नवीन फोर्ड फिगो घ्यायची आहे. माझा वापर फक्त आठवडय़ात एक-दोन वेळाच असेल, मग पेट्रोल घ्यावी की डिझेल. ही गाडी कशी आहे, माझे बजेट सहा ते आठ लाख रुपये आहे.

– प्रणव इगवे, नाशिक.

’नवीन फोर्ड फिगो उत्तम गाडी आहे. तुम्हाला ऑटो ट्रान्समिशनवाली गाडी हवी असेल तर सिक्स स्पीड फिगो विथ दीड लिटर इंजिन हा चांगला पर्याय आहे. ही गाडी तुम्हाला साडेसात लाखांपर्यंत मिळेल.

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

Story img Loader