टाटा इण्डिगोच्या इसीएस या गाडीची आता थेट लिम्का बुकात नोंद झाली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि पश्चिमेकडील कोटेश्वर ते ईशान्येतील किबितु ही दोन टोकं या गाडीने अवघ्या १५ दिवसांत जोडली. या महिन्याच्या सुरुवातीला ‘इण्डिगो एन्ड्युरन्स’ प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. टाटा मोटर्स आणि ऑटोकार इंडिया यांच्यातर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. देशाच्या चारही कोपऱ्यांना जोडण्यासाठी ही अखंडित रॅली होती. त्यात इण्डिगो ईसीएसने बाजी मारली.
या स्पध्रेतील इण्डिगोची कामगिरी अशी
* इंधन वापर आणि मायलेज : ४१.१४ किमी प्रतिलिटर
* सरासरी इंधनाचा वापर : १८.७ किमी प्रतिलिटर
* प्रवासासाठी लागलेला वेळ : ३४२ तास
* कारमध्ये ड्राइव्ह करताना लागलेला सर्वात जास्त कालावधी : ९६ तास
* एकाचवेळी अधिकाधिक कापलेले अंतर : ९९८ किमी
* २४ तासांत कापलेले सरासरी अंतर : ९३३.८ किमी
* आत्यंतिक कमी तापमानात केलेले ड्रायिव्हग :
-४ अंश सेल्सिअस
* अत्युच्च तामानात केलेले ड्रायिव्हग : ४८ अंश सेल्सिअस