टाटा मोटर्सने सेडान आकाराच्या टाटा इंडिगो व टाटा इंडिका या मोटारींच्या सीएनजीवर चालणाऱ्या आवृत्त्या बाजारात आणल्या आहेत.  दिल्लीत त्यांची किंमत ५.२७ लाख रुपये आहे. इमॅक्स मालिकेत या गाडय़ा तयार करण्यात आल्या आहेत. नवीन टाटा इंडिगो मॅक्सची किंमत ४.९९ लाख असून ती दिल्लीत ५.२७ लाख असेल. नवीन टाटा इंडिका इमॅक्सची किंमत ३.९९ लाख राहील, पण दिल्लीत ती ४.२६ लाख असेल. नवीन इमॅक्स गाडय़ा सीएनजी व पेट्रोल या दोन्हीवर चालवता येतील अशा पद्धतीने तयार केल्या आहेत. सीएनजी गाडय़ांना महत्त्व येत असून त्यासाठीच या गाडय़ा सीएनजी पर्यायात उपलब्ध करण्यात आल्याचे टाटातर्फे स्पष्ट करण्यात आले. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व त्रिपुरा येथे या गाडय़ा उपलब्ध असतील. टाटा मोटर्सने इंडिगो व इंडिका इमॅक्स गाडय़ा होरायझननेक्स्ट या कार्यक्रमावेळी पुण्यात जून २०१३ मध्ये प्रदर्शित केल्या होत्या व यात टाटा नॅनो इमॅक्स ही पहिली गाडी होती.

Story img Loader