ऑडीच्या मोटारी म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाने साकारलेल्या असतात. सर्वसाधारण उच्च आर्थिक श्रेणीतील या मोटारी असल्याने अनेकदा या मोटारींची धाव ही प्रामुख्याने चांगल्या राष्ट्रीय महामार्गावर, द्रुतगती महामार्गावर होत असते, पण तरीही सर्वसाधारण राज्य मार्गावर, खडकाळ मार्गावरही ही किती समाधानकारक मार्गक्रमण करू शकते हे पाहाण्याचा प्रयत्न ऑडी ए ४ च्या नव्या आवृत्तीच्या मोटारीद्वारे केला. मुंबई ते लवासा, लवासा ते ताम्हाणी घाटमार्गे मुंबई-गोवा महामार्ग व तेथून मुंबई अशा मार्गाने सुमारे चारशे किलोमीटरचा पल्ला पार केला. वाटेत खडकाळ रस्ता, धुवाधार पाऊस आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणातील कामामुळे अनेक ठिकाणी असणारे अडथळे तसेच मुंबईतील एकंदर वाहतूक अशा स्थितीत ड्राइव्ह केले गेले.
या मार्गावर सुमारे २५० किलोमीटरचा पल्ला व त्याला लागणारा वेळ हा वाहन चालविण्याच्या आनंदामधील ठरला. उर्वरित वेळ रस्त्यामधील त्रास व अत्याधुनिक तंत्रासह असणारे वाहनचालनही कंटाळवाणे वाटले. एकंदर अत्याधुनिक तंत्रामुळे ऑडीच्या वाहन चालविण्याच्या ए-४ (२ टीडीआय) च्या नव्या आवृत्तीत अधिक बदल केले गेले आहेत. सेंटर कॉन्सोलवर गीयर टाकण्याची कळ असून त्यावर क्लचरहित ड्रायव्हिंगचा आनंद देणारी ही यंत्रणा आहे. ब्रेक ऑपरेटेड ही यंत्रणा आहे. ड्रायव्हिंग मोडवर ही कळ टाकल्यानंतर तुमचा गीयर हा स्पोर्ट मोडवर म्हणजे अधिक गती प्राप्त करण्यासाठी टाकता येतो तो केवळ एकदा ती कळ खाली दाबल्यानंतर! पुन्हा ड्रायव्हिंग मोडवर येण्यासाठी ही कळ पुन्हा वर दाबली की सर्वसाधारण गती देणारी गीयर प्रणाली प्राप्त होते. याच मोडमध्ये ही कळ क्लीनरसाइडला हलविली की मॅन्युअल पद्धतीने गीयर टाकता येतात व तेदेखील ही कळ त्या वेळी फक्त वर हलवीत जात राहायचे म्हणजे तुमचा गीयर दोन ते ८ या गतीसाठी पडतो. तुमचा एक्सलरेटरवरील दाब कमी करून तुम्ही वेग कमी करताच या स्थितीतही तो गीयर कळ न दाबता खालचा गीयर पडला जातो. मॅन्युअल पद्धतीने गीयरचा वापर नको असल्यास तुम्हाला पुन्हा ड्रायव्िंहग मोडवर येता येते.
ऑटोमॅटिक बटण दाबल्यास तुम्हाला ब्रेक दाबून सिग्नलला मोटार उभी केल्यानंतर ब्रेकवर पाय ठेवून गाडी उभी ठेवण्याची गरज पडत नाही, हॅण्डब्रेक आपोआप लागला जातो. मात्र ते बटण ऑफ असेल तर तुम्हाला ब्रेकवरील पाय कायम ठेवावा लागतो. अशी ही यंत्रणा खूपच उपयुक्त असते. चढावावर गाडी थांबली गेली तर ब्रेकवर पाय ठेवून पुढे सरकण्याची गरज नाही. ब्रेक लावल्यानंतर गाडी उभी राहाते व सावकाश पुढे सरकता येते. तंत्रज्ञानाचा हा चांगला फायदा येथे अनुभविण्यास मिळतो.
ऑडी ए ६ सारखी अति ताकद या मोटारीला नाही, मात्र १९६८ सीसीचे इंजिन क्वात्रो पद्धतीचे आहे. त्यामुळे फोर व्हील ड्राइव्हचा आनंद तुम्हाला मिळतो. वेग झटकन मिळतो, चढावावर ताकद नियंत्रित रूपात वापरता येते, ज्यामध्ये गती मिळते व हळू वेगामध्ये ताकद चांगली असल्याचा व अधिक टॉर्क मिळत असल्याचेही लक्षात येते. अंतर्गत व बाह्य सौंदर्याबरोबरच दणकटपणा हे ऑडी ए ४ चे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अंतर्गत सौंदर्यामध्ये उत्कृष्ट प्रतीचे लेदर वापरून तयार केलेल्या आसन व्यवस्थेमध्ये असणारे आरामदायी गुणधर्म, पायाकडील भागात असणारी ऐसपैस जागा बसण्यासाठी मस्त वाटते. वाहन चालविणाऱ्याला त्याचे आसन वरखाली, पुढेमागे करण्यासाठी इलेक्ट्रिक यंत्रणेद्वारे सज्ज आहे. पुढील बाजूने निमुळते करता येते तसेच पाठीला आराम मिळण्यासाठी असणारे हवेचे दाब तयार करणारी यंत्रणा लांबच्या प्रवासात आरामदायी आहे. स्टीअरिंग व्हील पुढेमागे व वरखाली करता येते. याच स्टीअरिंग व्हीलवर अनेक नियंत्रणांच्या कळा असून त्या अत्याधुनिक सुविधांचा फायदा देत असतात. चालकासमोर असलेल्या टीएफटी स्क्रीन व डिजिटल स्क्रीनवर मिळणारी माहिती ही वाहन सुरक्षितपणे चालविण्यास मदत देतेच, शिवाय तुम्हाला तुमच्या किफायती प्रवासासाठीही मार्गदर्शन मिळू शकते. सन रूफ हा ऑडीच्या मोटारींमधील एक महत्त्वाचा आकर्षणाचा घटक आहे.
मागील प्रवाशाला आरामदायी आसनव्यवस्था व वातानुकूलित यंत्रणा असल्याने प्रवास खूप छान बनतो. लेगस्पेस ऐसपैस असल्याने उंच व्यक्तीलाही पायावर पाय ठेवून प्रशस्तपणे बसता येते. लिमोझिन नसूनही ही जागा समाधानकारक वाटते. व्हीलबेस मोठा असल्याने लांबच्या प्रवासात चांगलेच रिलॅक्स वाटते. पाठीलाही त्रास होत नाही, अशी रचना मागील आसनाची असून त्यामुळे मागील आसनस्थ व्यक्तीला ए ४ ने लांबचा प्रवासही आवडेल. अंतर्गत उंची, लांबी व रुंदीही प्रशस्त असल्याने मोकळेपणा अधिक जाणवतो. बाह्य रूपाप्रमाणे आतील रूपसौंदर्यही उच्च दर्जाच्या मटेरिअलने तयार केलेले आहे.
ए ४ चे बाहेरील आरसे तसे फार रुंद नाहीत, मात्र तरीही त्यातून मागील वाहनांचा, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांचा अंदाज येतो. अजून ते आरसे थोडे रुंद असले तरी चालले असते. रात्रीच्या वेळी मागील वाहनांच्या हेडलॅम्पचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व आरसे अ‍ॅन्टिरिफ्लेक्शनचे असल्याने खूप फायदा मिळतो.
टीएफटी स्क्रीनमध्ये मागील कॅमेऱ्यामुळे दिसणाऱ्या सुस्पष्ट व मार्गदर्शक रेषांमुळे गाडी मागे घेताना चालकाला खूप सहजता मिळाली आहे. रात्रीच्या वेळीही केवळ तुमच्या मोटारीच्या ब्रेक व टेल लॅम्पमुळे सुस्पष्ट मागील बाजू या स्क्रीनमध्ये दिसून येते. ज्यामुळे ए ४ सारखी गाडी मागे घेणे सहजसुलभ बनते.
ताम्हिणी घाटातील वळणे, खड्डे यामध्ये ए ४ च्या मोठय़ा व्हीलबेसमुळे वाहनचालनात सहजता मिळाली. मात्र रस्ते खराब असतील, तर वेग काहीसा अधिक असेल, तर मात्र मागील प्रवाशाला चांगलेच वरखाली व्हावे लागत असल्याचे वाटते. मात्र धक्के फार बसत नाहीत.
ग्राऊंड क्लीअरन्सचा त्रास
ग्राऊंड क्लीअरन्स हा भारतीय रस्त्यावरील तसा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. द्रुतगती महामार्ग व सर्वसाधारण महामार्ग सोडल्यास भारतीय रस्त्यांची स्थिती बिकट असते. स्पीडब्रेकर्स (गतिअवरोधक) ओलांडताना परदेशी बनावटीच्या अनेक मोटारी रस्त्यावर खालून घासल्या जातात.  तळाच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक पत्र्यामुळे महत्त्वाचा भाग धक्क्यापासून बचावला जातो.  ए ४ चा ग्राऊंड क्लीअरन्स फार अधिक नाही. साधारण १५५-१६० मिमिपर्यंत तो असावा. ही सेदान मोटार असल्याने पुढील व मागील चाकांमधील अंतर हे अधिक असते. यामुळे विद्यमान ग्राऊंड क्लीअरन्सचे अंतर ताशी  ० ते १० किलोमीटर इतक्या वेगामध्ये असतानाही गतिअवरोधकाच्या उंचवटय़ाला मोटार खालून लागण्याची शक्यता वाटते. अतिशय हळू गतीमध्ये गतिअवरोधकावरून ए ४ न्यावी लागते. गतिअवरोधकाच्या उंचवटय़ाच्या रूपात सलग चार-पाच उंचवटे असतील तरी अतिशय हळू गतीने पुढे सरकावे, तर गतिअवरोधका एकच उंचवटा असेल तर ताशी १० किलोमीटरच्या वेगातही ब्रेक मारताना गतिरोधकाला तळातील पत्रा घासला जाण्याची शक्यता आहे. राज्यमार्ग, ग्रामीण भागातील मार्ग किंवा अधिक उंच गतिअवरोधक हे ए ४ चे तसे शत्रू ठरावेत. क्वॉत्रो असल्याने वेग हा चांगल्या पद्धतीने मिळतो व वेग हाच या प्रकारच्या रस्त्यावर मारक ठरू शकतो. गतिअवरोधक नजरेस आला नाही व अचानक ब्रेक मारावा लागला तर मोटार नियंत्रणात येते, पण काहीशा  सुमारे ताशी २० किलोमीटर वेगात असल्यास गतिअवरोधकाच्या उंचवटय़ावर तळातील पत्रा आपटू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तांत्रिक वैशिष्टय़े
लांबी/रुंदी/उंची/व्हील बेस (सर्व एमएम मध्ये) ४७०१/१८२६/१४२७/२८०८
इंजिन ऑइल क्षमता – ५ लीडर
इंधन क्षमता – ६३ लिटर
इंजिन – इनलाइन फोर सिलेंडर डिझेल इंजिन, व्हीडीजी टबरे चार्जरसह. डीओएचसी. टीडीआय डायरेक्ट इंजेक्शन. १९६८ सीसी.
कमाल ताकद – १०५ किलोव्ॉट (१४३ एचपी) ४२०० आरपीएम.
कमाल टॉर्क – ३२० एनएम १७५०-२५०० आरपीएम.
ड्राइव्ह टाइप – इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅमसह फ्रंट व्हील ड्राइव्ह.
क्लच – कंटिन्यूअसली व्हेरिएबल मल्टिट्रॉनिक ट्रान्समिशन डीआरपीसह, स्पोर्ट प्रोग्रॅम.
सस्पेंशन – फ्रंट – फाइव्ह लिंक फ्रंट सस्पेंशन. अप्पर अँड लोअर विशबोन्स टय़ुब्युलर अ‍ॅन्टी-रोल बार / रेअर – इंडिपेन्डंट व्हील ट्रॅपेझोडाइल लिंक रेअर सस्पेंशन रेसिसेन्टली माऊंटेड सब फ्रेमसह, अ‍ॅन्टी रोल बार.
स्टीअरिंग – इलेक्ट्रोमॅकेनिकल पॉवर स्टीअरिंग.
ब्रेक – डय़ुएल सर्किट ब्रेक सिस्टम डायग्नोअल स्प्लिटसह. एबीएस/ईबीडी ब्रेक असिस्टसह, टान्डेंम ब्रेक बूस्टर. फ्रंट व्हेन्टिलेटेड डिस्क, रेअर डिस्क.
व्हील व टायर्स – ७ जे/१६ कास्ट अ‍ॅल्युमिनियम अलॉय व्हील्स/ २२५/५५ आर १६ टायर्स
सर्वाधिक वेग – ताशी प्रति २१० किलोमीटर.
वेग घेण्याची क्षमता – ० ते १०० सेकंदांत ताशी किलोमीटर – ९.१ किलोमीटर सेकंदाला वेग पकडण्याची क्षमता.
वजन – चालक वगळून १५१५ किलोग्रॅम.

चोरीपासून संरक्षणासाठी
*    अलार्म यंत्रणा
*    अ‍ॅन्टी थेप्ट बोल्टस्
*    ऑटो रीलीज फंक्शन

ए-४ आवृत्तीमधील नवीन वैशिष्टय़े
*    नवीन स्पोर्टी लूकचे आरेखन
*    झेनॉन प्लस हेडलाइट व दिवसाच्या वेळेत लेड रनिंग लाइट पुढील बाजूला व मागील बाजूला लेड टेल लाइट
*    चालकासाठी उच्च तंत्रज्ञानाने युक्त साहाय्यक यंत्रणा
*    अंतर्गत सौंदर्यवृद्धी करणारे रंग, कच्चा माल आदी विविध घटक.
*    संगीत यंत्रणा नियंत्रणामध्ये नवीन प्रकारची नियंत्रण शैली.
*    टॉर्क नियंत्रित रूपात देणारी चारही चाकांसाठी गतिदायी क्वॉत्रो पद्धत.
*    धुक्यातील वातावरणात स्पष्ट दिसण्यासाठी फॉग लाइट.
*    प्रकाशानुसार व पावसाळी वातावरणानुसार आवश्यक कार्यवाही करणारे सेन्सर्स.
*    पुढील दोन्ही आसनांना वरखाली करण्यासाठी इलेक्ट्रिक नियंत्रण यंत्रणा.
*    क्रूझ कंट्रोल.
*    तीन बाजूंनी वातानुकूलन देणारी यंत्रणा.
*    चालकाच्या आसनाला योग्य स्थितीत ठेवणारे तीन पर्याय सेव्ह करणारी यंत्रणा.
*    बाहेरील आरसे इलेक्ट्रिकच्या साहाय्याने जुळविण्याची सुविधा.
*    संगीत यंत्रणेत ब्लूटूथ व परस्परसंवादी रचना
*    ड्रायव्हरला माहिती देणारी यंत्रणा कलर डिस्प्लेसह.