या सदरासाठी तुमचे प्रश्न ’ls.driveit@gmail.com वर पाठवा.
’मी फोर्ड क्लासिक १.४ टीडीसीआय ही डिझेल गाडी पाहिली आहे. मला ती फार आवडली आहे. पण हे मॉडेल बंद होत असून तिचे इंटरनेट वरील रिव्ह्य़ू फारसे चांगले नाहीत. कृपया याबद्दल माहिती द्यावी. (माझे बजेट ८-९ लाख आहे)
– आनंद मुधोळकर, नांदेड</strong>
’तुम्हाला स्पेस आणि टॉप एण्ड मॉडेलमध्ये हीच गाडी कमी किमतीत मिळू शकते, पण या गाडीचा पुढे देखभाल खर्च जास्त आहे आणि १.४ टीडीसीआय इंजिनही बंद केले आहे. तर तुम्ही एक तर फोर्ड अस्पायर घ्यावी किंवा टोयोटा इटिऑस. या गाडय़ा अगदी उत्तम आणि पुरेपूर पसा वसूल आहेत.
’मी सरकारी नोकर आहे. मला चार-पाच जणांसाठी कार घ्यायची असून माझे बजेट चार ते साडेचार लाख रुपये आहे. आम्हाला गरजेपुरतीच गाडी वापरायची आहे. कृपया सांगा कोणती गाडी घेऊ.
– दीपक पवार, मु. पाचळ, ता. राजापूर.
’तुमच्या एकंदर गरजेनुसार व बजेट पाहता तुम्हाला मारुती अल्टो ८०० ही गाडी उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरासाठी गाडीचा वापर करीत नसाल तर तुम्ही एसटीडी मॉडेल घ्यावे. जे की इतर मॉडेलपेक्षा ७० हजार रुपयांनी स्वस्त आहे.
’स्विफ्ट डिझायर व्हीडीआय चांगली की सेलेरिओ झेडएक्सआय. किंवा स्विफ्ट डिझायर व्हीडीआय चांगली की स्विफ्ट डिझायर झेडएक्सआय?
– रौनक लोढा
’तुम्हाला निव्वळ डिझेल कारच घ्यायची असेल आणि तुमचे मासिक रिनग किमान दीड हजार किमीचे असेल तर मी तुम्हाला स्विफ्ट व्हीडीआय ही गाडी सुचवेन. मात्र मारुतीच्या इतर गाडय़ांचे पेट्रोल इंजिनही स्मूद आहे, विशेषत: के. सीरिजचे. ते तुम्हाला १८ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते. त्यामुळे तुमचे मासिक रिनग कमी असेल तर तुम्ही नक्की झेडएक्सआय मॉडेलचा विचार करावा.
’बिझनेससाठी पाच आसनी हॅचबॅक कार कोणती आहे. माझे बजेट सात लाख रुपये आहे. स्विफ्ट कार चांगली आहे का? दररोजचे रिनग किमान २५ किमी असेल. चांगली पिकअप असणारी गाडी कोणती? कृपया सांगा.
– चिंतामणी कुलकर्णी
’मी तुम्हाला फोक्सवॅगन पोलो १.६ एल ही गाडी सुचवेन. या गाडीचे इंजिन पेट्रोलवर चालणारे असल्याने या गाडीचा वेग इतर गाडय़ांपेक्षा वेगवान आहे. तसेच स्पोर्टस् मॉडेलही आहे हिचे.
’मला कार घ्यायची आहे. माझे बजेट सहा ते सात लाख रुपये आहे. कारचा वापर फक्त कुटुंबीयांसाठीच करणार आहे. शिवाय सुट्टय़ांमध्ये बाहेरगावी फिरण्यासाठी गाडी वापरणार आहे. चांगला मायलेज असणारी गाडी कोणती घ्यावी?
– सौरभ चव्हाण
’मारुतीची नवीन आलेली बालेनो घ्या. हिचा देखभाल खर्च खूप कमी आहे. आणि फीचर्स व मायलेजही चांगले आहेत.