*मला पाच लाखांपर्यंत रोजच्या वापरासाठी कार घ्यायची आहे. रोजचे अंतर आठ ते नऊ किमी आहे. मला कोणती सीएनजी कार सुचवाल.
– चंद्रकांत गोरिवले
*मारुतीचे सीएनजी मॉडेल चांगले आहे. मध्यम मॉडेल रिट्झ व अल्टोचे टॉप मॉडेल हे घ्यावे किंवा अधिक बजेट असेल तर सेडानमध्ये डिझायर कार घ्या.
*मला डिझेल कार घ्यायचीय. टाटा इंडिका व्हिस्टा कशी आहे. माझे बजेट चार-पाच लाखांचे असून या बजेटमध्ये घेता येऊ शकेल अशी कोणती चांगली हॅचबॅक कार आहे.
– विनीत गिरम
*विनीतजी तुम्ही विचारलेल्या प्रश्नातच तुमचे उत्तर आहे. टाटा इंडिका व्हिस्टा ही गाडी चांगली आहे. मायलेज चांगला देते. तसेच याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळू शकणारी दुसरी चांगली हॅचबॅक म्हणजे मारुती व्ॉगनआर. दोन्ही गाडय़ांचा तुम्ही विचार करू शकता.
*माझे बजेट सात ते आठ लाखांचे आहे. मला कार घ्यायची आहे. कृपया सुचवा.
    – कल्याण कुण्डे
*चालणारी गाडी हवी. सीएनजीचाही पर्याय आहे. तुम्हाला सेडान, हॅचबॅक, कॉम्पॅक्ट एसयूव्ही यांपैकी कोणत्या प्रकारची गाडी हवी, या सगळ्याचाच तुम्ही उल्लेख केलेला नाही. असो. तरीही तुमच्या बजेटमध्ये बसू शकतील अशा या तीनही प्रकारच्या गाडय़ा आहेत. तुम्हाला कॉम्पॅक्ट एसयूव्ही हवी असेल तर निस्सानची टेरानो आहे, शेवरोलेची डस्टर आहे, मारुतीची अर्टिगा आहे, फोर्डची इकोस्पोर्ट आहे. या सर्व गाडय़ा तुम्हाला तुमच्या बजेटात मिळू शकतात. शक्यतो थोडे पैसे जास्त लागतीलही. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या प्रकारची गाडी हवी आहे, अर्थात तुमच्या गरजेनुसारच.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

Story img Loader