dr04* मला अशी हायब्रीड कार (पेट्रोल आणि सीएनजी एकत्रित) विकत घ्यायची आहे की जी मला चांगला मायलेजही देईल आणि तिचा मेन्टेनन्सही कमी असेल. माझे बजेट सुमारे तीन लाख रुपये आहे. कृपया मला पर्याय सांगा. – तुषार उपाध्ये
* तुमचे बजेट तीन लाख रुपये आहे. यात तुम्हाला टाटा नॅनो सीएनजी गाडी घेता येईल. तिची किंमत अडीच लाख रुपये आहे. कंपनीने फिट केलेले सीएनजी किट नेहमीच चांगले असते ते एक प्रकारे वॉरंटीच असते. टाटा नॅनो सीएनजीला ईमॅक्सकडून मिळालेले सीएनजी चांगले आहे आणि तिचा मायलेजही २७ किमी प्रतिलिटर एवढा आहे. नॅनो नको असेल तर तुम्ही मारुती अल्टो के१०चाही विचार करू शकता. परंतु तिची किंमत चार लाख आहे. तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागेल.
तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

Story img Loader