* मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझे बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. मला कोणती गाडी घेणे परवडेल. साधारण महिन्याला माझा प्रवास २०० किमी होतो.
– डॉ. सचिन साळवे, अहमदनगर
* तुम्ही वॅगन आर, स्विफ्ट किंवा आय१० वा आय२० यांपकी एक पर्याय सुचवायला सांगितले आहे. तुम्हाला मग तुमच्या बजेटच्या दृष्टीने वॅगन आर उपयुक्त ठरेल. ही गाडी चांगला अॅव्हरेजही देते व कम्फर्टेबलही आहे. शिवाय तुमच्या आवाक्यातही आहे. तुम्हाला पेट्रोल, डिझेल व सीएनजी या तीनही व्हर्जन्समध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
*मी Indica V2 GLS Xeta (Petrol + LPG) ही कार घेतोय. सध्या ही कार मिळत नाही. त्याचे पुढील model eV2 market मध्ये उपलब्ध अहे. पण ही xकार मला २.५ लाख ना showroom ऑफर करत आहे. कारण stock‘ ला राहिलेली गाडी आहे . या कारला मला mileage किती मिळेल व घेणे योग्य राहील का?
– महेश पवार
* इंडिकाचे व्ही२ जीएलएस झेटा हे मॉडेल जुने आहे. त्यामुळे तुम्ही गाडी घेताना नीट तपासून घ्या. गाडी तुम्हाला नेमकी किती मायलेज देऊ शकेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, नव्या गाडीचा मायलेज चांगला आहे. शक्यतो तज्ज्ञांना विचारूनच हा निर्णय घ्यावा.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.
कोणती कार घेऊ?
तुम्ही वॅगन आर, स्विफ्ट किंवा आय१० वा आय२० यांपकी एक पर्याय सुचवायला सांगितले आहे. तुम्हाला मग तुमच्या बजेटच्या दृष्टीने वॅगन आर उपयुक्त ठरेल.
First published on: 16-10-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car to buy