* मला टाटा व्हेंचर ही सिटी व्हॅन माझ्या दैनंदिन वापरासाठी खरेदी करायची आहे. मात्र, या गाडीसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. निम्म्या लोकांना ही गाडी चुकीच्या पद्धतीने डिझाइन केलेली वाटते, तर काहींना ही गाडी उत्कृष्ट असल्याचे वाटते. त्यामुळे नेमके काय मत बनवावे आणि गाडी घ्यावी की न घ्यावी, याबाबत द्विधा मनस्थिती आहे.
– विवेक गोखले, पुणे.
* टाटांची कोणतीही गाडी चांगलीच असते. त्यामुळे इतर लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करून बिनधास्त टाटा व्हेंचर घ्या. या गाडीमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. त्यामुळे तुम्ही बेलाशक ही गाडी घ्यावी.
* ह्य़ुंदाईची नवीन इलाइट आय२० कशी आहे. गाडी पेट्रोल घ्यावी की डिझेलवर चालणारी, माझा वार्षकि प्रवास २५ हजार किमीचा आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
–ऋषीकेश चव्हाण
* ह्य़ुंदाईच्या नवीन इलाइटचा पिक-अप आणि मायलेज चांगला आहे. तुमचा वार्षकि प्रवास २५ हजार किमीचा आहे, म्हणजेच तुम्ही दरमहा किमान २०० ते २५० किमीचा प्रवास करता. हे पाहता तुम्ही डिझेलवर चालणाऱ्या इलाइट आय२०चा विचार करणे योग्य ठरेल. गाडी चांगली आहे.
* मला तीन ते साडेतीन लाखांपर्यंतची कार घ्यायची आहे. कोणती योग्य ठरेल, मारुती अल्टो की ह्य़ुंदाई इऑन?
– रोहित बाकरे, श्रीरामपूर
* अल्टो हा चांगला पर्याय आहे. तुमच्या बजेटमध्ये ती परफेक्ट बसेल. इऑन थोडी महाग जाईल.
* मला सेकंड हँड अल्टो घ्यायची आहे. जुनी कार घेताना काय काळजी घ्यावी.
– गोवर्धन दिकोंडा
* जुनी गाडी घेताना ती किती किमी धावली आहे, याचा तपास करावा. शक्यतो तीन वर्षांपेक्षा जास्त न वापरलेली असावी. गाडीच्या इंजिनाची सव्र्हिसिंग कितीदा झाली आहे याची चाचपणी करावी. गाडी सुस्थितीत आहे की नाही हे पाहावे. जुन्या गाडय़ा घेताना काय काळजी घ्यावी याची माहिती २८ ऑगस्टच्या ड्राइव्ह इट पानावर देण्यात आली होती. त्याची लिंक येथे देत आहोत. <https://loksatta.com/ drive-it-news/old-is-gold-but-after-testing-817756/> कृपया ती पाहावी.
कोणती कार घेऊ?
मला टाटा व्हेंचर ही सिटी व्हॅन माझ्या दैनंदिन वापरासाठी खरेदी करायची आहे. मात्र, या गाडीसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
First published on: 25-09-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car to buy